नागपूर :- “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती” दिनानिमित्त शुक्रवार दिनांक १४ एप्रिल, 2023 ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचना उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ.गजेंद्र महल्ले यांनी केली आहे.