संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-रब्बानी आई टी आई मध्ये ‘विश्व युवा कौशल्य दिवस’ साजरा
कामठी ता प्र 15 :- संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने नोव्हेंबर २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केले त्यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली कौशल्य भारत (स्किल इंडिया)योजनेची घोषणा केली. गेल्या काही वर्षात तंत्रनिकेतन शाखाकडे पाठ फिरवलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने आयटीआय कडे आकर्षित होत असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे मौलिक मत कार्यक्रमाचे अध्यक्ष बीजेपी युवा मोर्चा चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोंडुलवार यांनी कामठी येथील रब्बानी आय टी आय मध्ये आयोजित विश्व युवा कौशल्य दिवस कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.दरम्यान इलेक्ट्रिशियन ट्रेड प्रथम वर्षचे विद्यार्थी मोहम्मद तनवीर यांनी हिंदी तसेच सैयद मोइज़ यांनी इंग्रजी भाषेत विश्व युवा कौशल दिवस चे महत्व व इतिहास यावर भाषण केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून रब्बानी आई.टी.आई. चे प्राचार्य रेहान कौसर, जुबेर अहमद, तफज्जुल जमाल व मोहम्मद असलम उपस्थित होते . कार्यक्रमाचे मंच संचालन तौफिक अहमद यांनी केले असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रब्बानी आई.टी.आई चे फिटर व इलेक्ट्रिशियन ट्रेड च्या विद्यार्थिनी मोलाची भूमिका साकारली.
भारतात स्किल इंडियाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली-विजय कोंडुलवार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com