नागपूर:- बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा 67 वा वाढदिवस 15 मार्च रोजी जनकल्याणकारी दिवस म्हणून नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मदिन महोत्सव महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव पृथ्वीराज शेंडे यांचे अध्यक्षतेखाली उर्वेला कॉलनीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रदेश सचिव रंजना ढोरे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, कॅडर टीचर गोपाल खंबाळकर, जिल्हा प्रभारी नरेश वासनिक, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, डॉ शितल नाईक, माजी शहराध्यक्ष राजीव भांगे, माजी मनपा पक्षनेता गौतम पाटील, बामसेफ चे ऍड अतुल पाटील, महिला नेत्या प्रिया गोंडाने, सुरेखा डोंगरे, वर्षा वाघमारे, सुनंदा नितनवरे, तारा गौरखेडे आदींनी तसेच उत्तर नागपूरचे जगदीश गजभिये, दक्षिण नागपूरचे विकास नारायणे, पश्चिम नागपूरचे मनोज निकाळजे, दक्षिण पश्चिमचे व ओपूल तामगडगे, पूर्व नागपूरचे मुकेश मेश्राम, मध्य नागपूरचे विलास पाटील, हिंगण्याचे शशिकांत मेश्राम, सावनेरचे अभिलेश नागधवणे, काटोलचे सावलदास गजभिये, कामठीचे चंद्रगुप्त रंगारी आदींनी बहणजिंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून, भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी 2024 ला बहनजीला प्रधानमंत्री बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी “जयभीम-जयसंविधान” ची घोषणा देऊन त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
जनकल्याणकारी दिवसा निमित्ताने कार्यक्रमात प्रामुख्याने आयोजकांच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने गरीब, निराधार, विधवा, बेरोजगार, अपंग आदी गरजूंना विविध प्रकारच्या वस्तूंचे तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. यावेळी भव्य केक, 67 किलो लड्डूंचे वाटप व विविध प्रकारच्या वस्तूंचे गरजूंना वाटप हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी यांनी तर समारोप जिल्हा सचिव अभिलेश वाहाने यांनी केला.