अरोली :- येथून जवळच असणाऱ्या सिरसोली येथे दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार यंदाही येथील हनुमान मंदिर सिरसोली(तांडा) येथे नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त उद्या १ जानेवारी २०२५ बुधवारपासून दोन दिवसीय मंडईचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने एक जानेवारी 2025 बुधवार ला सायंकाळी सात वाजता मराठमोळ्या लावण्यांच्या कार्यक्रम तसेच दोन जानेवारी गुरुवारला सकाळी दहा वाजता पासून ते दिवसभर राष्ट्रीय संगीत खडा तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र शासन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कार्यक्रमाचे सहउद्घाटक माजी आमदार टेकचंद सावरकर ,भाजपा महामंत्री अनिल निधान, जि प सदस्य योगेश देशमुख, जि प सदस्या राधा मुकेश अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे, प्रमुख पाहुणे म्हणून जि प माजी उपाध्यक्ष सदानंद निमकर, माजी पंचायत समिती उपसभापती अशोक हटवार, पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम, भाजपा तालुकाप्रमुख भगवान बावनकुळे, ग्रामपंचायत सिरसोली सरपंच विनोद कारेमोरे ,उपसरपंच प्रमिला देशमुख ,माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ गायधने, ग्रामपंचायत सदस्य विष्णू भुते, आशिष मालापुरे नलू देशमुख, निलेशवरी कारेमोरे, ग्रामपंचायत तांडा सरपंच विनोद गभने, ग्रामपंचायत तोंडली सरपंच दर्शना बागडे, उपसरपंच रामपाल धांडे, ग्रामपंचायत पिंपळगाव सरपंच चाफले, ग्रामपंचायत तांडा माजी उपसरपंच चंद्रशेखर जाधव, ग्रामपंचायत खात माजी सरपंच कैलास वैद्य, ग्रामपंचायत वाकेश्वर सरपंच बादूले सह गावातील परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान सिरसोली/तांडा ग्रामवासीयांनी केले आहे.