अरोली :- खात येथील सर्व सिद्ध परिवार सेवा केंद्र तर्फे खात ( पांजरा रोड) येथील सिद्ध गोरक्षणाथ मंदिर येथे नुकताच पुणे येथील सिद्ध सेवक अध्यक्ष सुमित कुमार यांच्या हस्ते सिद्ध शक्ती स्तंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमानिमित्त सिद्ध पुरोहित कोहलू उईके यांच्या हस्ते बाधा हवन करण्यात आले, सिद्ध गोरक्षनाथ प्रतिमेचे अभिषेक आणि सिद्ध स्वामी हरदासजींच्या फोटोचे पूजन करून मनोकामना यज्ञ झाल्यानंतर सिद्ध शक्ती स्तंभ निर्माण करण्यात आले. स्वामी हरदास फाउंडेशन पुणे सिद्ध सेवक सुमित कुमार यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गायगोले गुरुजी (अंजनगाव सुर्जी), पुरोहित अरुण कुमार नेवरा, (नागपूर), व्यसनमुक्ती महासिद्ध जमीनदानदाता भाऊराव देवतारे, प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल , पुणे सिद्धपीठ लता ठाणगे, पुरोहित कमलेश निषाद (नागपूर) इंडक्टर (सिद्ध) मोहाडी येथील आनंदराव रायकवाड, लता रायकवाड, बोंद्री येथील ताराचंद कोयपरे, शामराव ठाकरे, भंडारा येथील सुखदेव बोरकर, भाऊराव मस्के, हरिदास मेश्राम, नागपूर येथील नागेश्वर शाहू, शहापूर येथील भास्कर भुरे, बनपुरी येथील ईश्वर पाटील, खापा येथील बालअशोक बिसेन,खेमराज ईश्वरकर
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्ध गोरक्षनाथ मंदिर येथील सर्व सिद्ध परिवार सेवा केंद्राचे पदाधिकारी चौरंगनाथ चरडे, भाऊराव देवतारे, रवींद्र मानकर ,दिगांबर ढोमणे, कवडू हरडे, भाऊलाल कहालकर, अर्जुन राऊत ,रामचंद्र कारेमोरे ,हरिदास मेश्राम, तुळशीदास मेहर, डॉक्टर माटे, बावनकर सह समस्त सदस्यगणांनी परिश्रम घेतले.