संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राष्ट्रीय सेवा योजना श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी कामठी तसेच ग्रामीण रूग्णालय कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सिकलसेल सप्ताह ११ ते १७ डिसेंबर अंतर्गत दि. १५/१२/२०२२ ला कामठी फार्मसी महाविद्यालयात सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सिकलसेल जनजागृतीच्या उद्देशाने आयोजित शिबिरात ग्रामीण रूग्णालय कामठी येथील डॉ शबनम व त्यांच्या चमूने २५० विद्यार्थीनींची सिकलसेल तपासणी तसेच ६० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शारीरिक रक्तघटक तपासणी केली.
यावेळी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे अभिनंदन केले. विद्यार्थी विकास विभागाचे अधिष्ठाता प्राध्यापक राधेश्याम लोहिया यांनी सिकलसेल नियंत्रण करीता राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना व शासकीय योजनांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम प्रमुख डॉ. रेणूका दास यांनी सिकलसेल अरली डिटेक्शन याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, संस्थेचे सचिव सुरेश भोयर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉॉ. मिलिंद उमेकर यांनी डॉ. शबनम यांचे आभार व्यक्त केले.