नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवात शनिवारी 25 जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा पार पडल्या. व्हीएनआयटी येथे ज्येष्ठ नागरिकांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांकरीता विविध वयोगटात दोन, दीड व एक किमी चालण्याची स्पर्धा घेण्यात आल्या. यात 80 वर्षावरील वयोगटात श्रीपत बुरडे आणि रेवती लोखंडे यांनी पुरुष व महिला गटात सुवर्ण पदक पटकाविले. 1 किमी अंतराच्या स्पर्धेत मधुकर पाठक व मधुकर भूचे यांनी दुसरे आणि तिसरे स्थान तर आशा दहाते यांनी दुसरे स्थान प्राप्त केले.
विजेत्यांना भाजपा नागपूर जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, सहसंयोजक सचिन देशमुख, अशफाक शेख, प्रकाश चांद्रायण, राम कोरके आदी उपस्थित होते.
61 ते 70, 70 ते 80 आणि 80 वर्षावरील वयोगटात विविध स्पर्धा पार पडल्या.
निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय)
पुरुष
वयोगट – 61 ते 70 : (2 किमी चालणे) : सुरेश शर्मा, उल्हास शिंदे, विठ्ठल बांते
वयोगट – 70 ते 80 : (1.5 किमी चालणे) : रामचंद्र कांदलवार, देविदास निवल, डोमा चाफले
वयोगट – 80 वर्षावरील : (1किमी चालणे) : श्रीपत बुरडे, मधुकर पाठक, मधुकर भूचे
महिला
वयोगट – 61 ते 70 : (1.5 किमी चालणे): सुनीता सूर्यवंशी, इंदिरा भोयर, चंद्रकांता हरिणखेडे
वयोगट – 70 ते 80 : (1 किमी चालणे) : सीमा पवार, प्रविणा कळंबे, हंसा व्यास
वयोगट – 80 वर्षावरील : रेवती लोखंडे, आशा दहाते