उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांची मेट्रो भवनला भेट

नागपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव आणि सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांनी आज मेट्रो भवन ला भेट दिली. नागपूरला राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून त्या निमित्ताने विविध अधिकारी शहरात दखल झाले आहेत. कालच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री सचिवालय व नगरविकास विभाग-१) भूषण गगराणी यांनी झिरो माईल फ्रिडम पार्क – एयरपोर्ट साऊथ – सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रोने प्रवास केला होता.

श्रीकर परदेशी यांनी आज मेट्रोने प्रवास केला. झिरो माईल मेट्रो स्टेशन येथून मेट्रो गाडीत बसून त्यांनी सीताबर्डी स्टेशन आणि तेथून एक्वा मार्गिकेवरील सर्वात शेवटचे स्थानक लोकमान्य नगर येथवर दौरा केला. लोकमान्य नगर स्थानकावरून त्यांनी महा मेट्रो च्या हिंगणा डेपो ला भेट दिली. या संपूर्ण प्रवासा दरम्यान महा मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित त्यांच्या सोबत होते आणि त्यांना नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या एकूणच प्रगती संबंधी माहिती त्यांना दिली. श्रीकर परदेशी यांनी हिंगणा डेपोचे देखील निरीक्षण देखील केले. परदेशी यांनी तत्पश्चात मेट्रो भवनला भेट दिली. येथील एक्सपीरियंस सेंटर, एक्झिबिशन सेंटर, वाचनालय असे विविध दालन त्यांनी बघितले. मेट्रो भवन येथील विविध व्यवस्था, या वास्तूचे स्थापत्य शास्त्र अश्या विविध बाबींबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली. नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेली हि व्यवस्था आणि सातत्याने वाढणारी प्रवासी संख्या हि सर्वांकरता सुखावणारी बाब असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर टाळत मेट्रोने परवा करावा हि अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

परदेशी यांच्या या संपूर्ण दौऱ्या दरम्यान महा मेट्रो चे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लांनिंग) अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक (ऑपरेशन) उदय बोरवणकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाटिया लॉन मधून महिलेचे 1 लक्ष चार हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

Sat Dec 24 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 24:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील भाटिया लॉन येथे आयोजित भाचीच्या लग्न समारंभात सहभागी झालेंल्या फिर्यादी महिलेची नजर चुकवून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी महिलेच्या सोनेरी रंगाच्या पर्समधून सोन्याचे व आर्टिफिशियल दागिने व एप्पल कंपनीचा एअर पॉड,डेबिट कार्ड व नगदी 10 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष चार हजार रुपयांचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com