– आयचित मंदीर नागपुर ते श्रीराम मंदीर रामटेक पालखी पदयात्रा
कन्हान :- राम नवमी करिता आयचित मंदीर नागपुर येथुन पायदळ पालखी यात्रा निघुन कन्हान शहरात स्वागत करून रात्री बळीराम दखने हायस्कुल कन्हान येथे स्वागत, भोजन व मुक्काम करून सकाळी कार्य क्रमांतर रामटेक करिता प्रस्थान करण्यात आली.
शुक्रवार (दि.४) एप्रिल ला आयचित मंदीर नागपुर ते श्रीराम मंदीर रामटेक पालखी पदयात्रा आयचित मंदीर महाल नागपुर येथुन पायदळ पालखी यात्रा निघु न सायं. कन्हान शहरात आगमन होताच पालखी यात्रे चे स्वागत करून रात्री बळीराम दखने हायस्कुल कन्हान येथे स्वागत, नास्ता, भोजन करून रात्री विश्रांती कर ण्यात आली. शनिवार (दि.५) एप्रिल ला सकाळी राम रक्षा पठन करून पालखी प्रमुख हरिराम कुडाळ, बल्लुजी बांगरे, मोरेश्वर ढोबळे, स्मिता केळकर, दिलीप वर्मा यांचे हस्ते मार्च २०२४ च्या १० वी बोर्डा च्या परिक्षेत शाळेतुन प्रथम आलेली संस्कृती विनायक लूहुरे व व्दितीय पियुष पप्पु चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बळीराम दखने हायस्कुल कन्हान चे मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव, विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत प्रामुख्याने उपस्थित होते. सकाळी ७.३० वाजता पालखी निघाली असता मार्गातील राय नगर कन्हान येथील महिलानी घरासामोर रांगोळी काढुन पालखीचे मनो भावे पुजन करून यात्रेकरूचे स्वागत केले. पुढे महा मार्गाने पालखी यात्रा रामटेक करिता प्रस्थान करण्यात आली.
या पालखी यात्रेच्या स्वागत सेवेकरिता बळीरा म दखने हायस्कुल कन्हानचे मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव, विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, संस्थेचे प्रतिनिधी यतिनकुमार पशिने, शिक्षक नागो चव्हाण, विलास ऊईके, माधव काठोके, देवेन्द्र सेंगर, शिक्षिका चारुलता चौकसे, लता काथवटे, कर्मचारी श्याम मेंढे, रुपराव भोंगाडे, अल्का भुरे, ललिता दमाहे आदीने परिश्रम घेतले.