– गुरूवार (दि.२०) ते शनिवार (दि.२२) तीन दिवस पालखी सोहळा.
कन्हान :- श्री हनुमान मंदिर टेकाडी (को.ख) येथुन श्री हनुमान पालखी पदयात्रा प्रस्थान करून जागृत श्री हनुमान मंदीर जामसावळी ला पालखी पदयात्रेकरू व्दारे अभिषेक,भव्य महाआरती, हवन आणि महाप्रसा दाने तीन दिवसीय पायदळ पालखी सोहळा थाटात संपन्न करण्यात आला.
गुरूवार (दि.२०) ला सकाळी ८ वाजता श्री हनुमान मंदीर टेकाडी (को.ख) गोंडेगाव व्दारे श्री हनुमान मंदिर टेकाडी ते जामसावळी तीन दिवसीय पालखी पदयात्रा सोहळयाची श्री हनुमान मंदीरात पुजा अर्चना करून टेकाडी गावाचे भ्रमण करून शुभारंभ करण्यात आला. भजन, किर्तन, ढोल, नगाडे, डीजे व महिला भजन मंडळाच्या मधुर आवाजात जय श्रीराम व जय हनुमान नामाचा गजर करित शेकडो श्री हनुमान भक्त महिला, पुरुष श्रीराम व श्री हनुमानाची मुर्ती रथात सजवुन पालखी पदयात्रा प्रस्थान करून टेकाडी बस स्टाप, कांद्री, कन्हान, कामठी, वारेगाव, खापरखे डा, दहेगाव,पिपळा मार्गे सायंकाळी
श्री हनुमान मंदीर कवडस मोहनी बाबा(पाटणसावंगी) येथे पोहचुन रात्री चे जेवण व पहिला मुक्काम करून शुक्रवार (दि.२१) ला सकाळी ८ वाजता आरती करून पुढे प्रस्थान करू न भसाळी टाकळी, माळेगाव, सावनेर,केळवद नंतर सायंकाळी मॉ शारदा मंगल कार्यालय तायगाव खैरी येथे रात्रीचे जेवण व दुसरा मुक्काम. शनिवार (दि.२२) ला सकाळी ८ वाजता पुजा, आरती करून पुढे बोरगा व (रेमंड) सकाळी ११.३० वाजता श्री हनुमान मंदीर जामसावळी ला पोहचुन जागृत श्री हनुमान मंदीरात अभिषेक, भव्य महाआरती, हवन आणि महाप्रसादाचा लाभ घेवुन सायंकाळी ६ वाजता टेकाडी गावाकडे प्रस्थान करून रात्री १० वाजता गावात पोहचुन पाल खी पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
श्री हनुमान मंदिर टेकाडी ते जामसावळी मंदीर तीन दिवसीय पालखी पदयात्रेचे चौका, चौकात, गावो, गावी भाविक भक्ता व्दारे पुजन व यात्रेकरूना शरबत, चाय, बिस्किट, फळे, अल्पोहार, भोजनदान करून भव्य स्वागत करण्यात आले. पालखी पदयात्रा सोहळ याच्या यशस्वितेकरिता गोपीचंद गुरधे, सुरेश खोरे, विलास राऊत, नत्थु मोहाडे, प्रज्वल गाडबैल, ललित चिंचुलकर, योगेश सावरकर, बाळु नाईक, विजय वाघ मारे, सुरेंद्र मोरे, मनोज गुरधे, राजु बेले, देवराव सातपैसे,
महाजन कांबळे, प्रशांत शेंदरे, राहुल हुड, गंगाधर मोरे, पंकज राऊत, योगेश कांबळे, पंकज सातपैसे, लोभेश चिंचुलकर, तोष्निल सातपैसे, संतोष गाडगे, प्रविण मास सह माऊली महिला भजन मंडळ टेकाडी च्या अंजली उमाळे, चंद्रकला राऊत, निर्मला हुड, मैना राऊत, बेबी राऊत, त्रिरोना इंगळे, माधुरी उमाळे, पार्वता भलावी, कमल धोटे, विमल हुड, शकुंतला गाडगे, हिरा दळणे, शिवशक्ती महिला भजन मंडळाच्या सविता सातपैसे,रत्नमाला नाकतोडे, वंदना सातपैसे, शोभा तरारे, गीता सातपैसे, रेखा ढोरे, वनिता सातपैसे, सुनंदा वानखेडे, सुनिता सातपैसे आदी सह ग्रामस्थानी सहभागी होऊन सहकार्य केले.