नागपूर :- नागपूर शहरातील सर्व श्री गजानन महाराज भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत गजानन महाराज यांची पायी दिंडी यात्रा रविवार दि. ३० ऑक्टोबर २०२२ ला श्री संत गजानन महाराज मंदीर, निर्मल नगरी, उमरेड रोड, नागपूर येथून सकाळी ६.०० वाजता निघेल.
श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर कोराडी येथे जाणार आहे. करिता सर्व श्री भक्तांना विनंती करण्यात येते की, दिंडी यात्रेत सहभागी होवून “श्रीं” चा कृपाप्रसाद प्राप्त करावा. सर्व श्री भक्तांकरिता दुपारी २.०० वाजेपासून महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
श्री भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे.
दिंडी यात्रेचा मार्ग खालीलप्रमाणे राहील निर्मल नगरी सक्करदरा चौक – गणेशपेठ बसस्टँन्ड कॉटन मार्केट गणेश टेकडी -एन. आय.टी. ऑफीस श्री महालक्ष्मी मंदिर कोराडी. सदर – झिंगाबाई टाकळी मानकापूर