सावनेर – खरडुका ग्रामपंचायत अंतर्गत संरपंच, शोभाताई भरबत,मान्यवर गावकरी मंडळी डॉ निलेश लाकडे,( कृष्णा मेडिकल सावनेर ) शुभम गौरखेडे ( शिव पॅथॉलॉजी लॅब सावनेर )तसेच शासकीय विभागाचे आय.सी.टी.सी चे मा.सचिन झाडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रद्धा बर्वे, लिंक वर्कर सह्याद्री संस्था नागपुर चे नितेश नागदिवे ,प्रमिला डुकरे यांनी HIV वर मार्गदर्शन करून जन जागृती अभियान सुरू ठेवावे असे व्यक्त केले .
या वेळी उपस्थित असलेल्या गावकरी मंडळी यांना समजावून सांगितले व तसेच श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज सावनेर चे संचालक जामुवंत वारकरी यांनी गांवकरी लोकांना मास्क लावा – कोरोणा टाळा, शासकिय नियमाचा पालन करा या वर जनजागृती करून मार्गदर्शन केले या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदुकुमार भरबत, सचिव शुभांगी टेकाडे सहकार्य राजु वाघाडे , हर्षल भुर्के,मंयुरी वाकोडे, प्रगती कोडापे, लक्ष्मी खंडाते, शिवानी सुरजुसे ,व संस्थेचे कोषाध्यक्षा सुषमा भरबत यांनी प्रमुख पाहुण्यांचे व श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज सावनेर चे सर्व विद्यार्थीने या कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले असता या सर्वांचे आभार व्यक्त केले .