अरोली :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मांगली (तेली) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमाचे आयोजन करून श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे.
आज 18 फेब्रुवारी मंगळवारला सकाळी आठ वाजता भगवे वादळ ग्रुप व समस्त मांगली (तेली )ग्रामवासी यांच्या तर्फे राष्ट्रीय आजाद तिरंगा निशान, शाहीर मंगेश शेंडे यांच्या संगीत खडा तमाशाचे आयोजन करण्यात आले. उद्या 19 फेब्रुवारी बुधवार ला सायंकाळी साडेचार वाजता रॅली, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे सायंकाळी सात वाजता पूजन, त्यानंतर सप्त खंजिरी वादक प्रबोधनकार युवराज मानकर यांच्या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, पुढारी, मान्यवर उपस्थित राहणार आहे .
या सामाजिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान शिवजयंती उत्सव मांगली (तेली) सह समस्त ग्रामवासीयांनी केले आहे. सर्व ग्रामवासी या कार्यक्रमाला सहकार्य करीत असून परिश्रम करताना दिसत आहे.