धक्कादायक ! फडणवीसांची भूमिका नवी,कृती टिकायला पचायला आवडायला हवी 

2014 दरम्यान देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांची अर्थातच संपूर्ण राज्यावर आजच्यासारखी पकड नव्हती त्यामुळे उद्धव ठाकरेंसारख्या मित्रपक्षांनी त्यांना हलक्यात घेतले आणि शरद पवार किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी थोडक्यात त्यावेळेच्या समस्त विरोधकांनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपद भाजपाची फसलेली चुकलेली खेळी भूमिका व निर्णय या पद्धतीने विचार करीत हा प्रकार हसण्यावारी नेला, हल्लीहल्लीपर्यंत शरद पवार देखील फडणवीसांच्या बाबतीत काहीसे गाफील असल्याने ते स्वतः आणि त्यांच्या काही रखेल पद्धतीच्या मीडियाकडून नेत्यांकडून अगदीच खालच्या पातळीवर उतरत फडणवीसांची ज्यापद्धतीने थट्टा करायचे खिल्ली उडवायचे देवेंद्र मात्र वरकरणी शांत आहे दचकून आहे असे केवळ भासवायचे, मनातल्या मनात मात्र पवार उद्धवजी काँग्रेस आणि त्यांच्या बाजूचे ठेवलेल्या बाईसारखे काही नेते आणि मीडियातले काही त्यावर गालातल्या गालात हसायचे आणि लगेच पुढल्या कामगिरीवर चढाई करून मोकळे व्हायचे, एकही क्षण न थांबता न थकता, वरकरणी शांत हसमुख देवेंद्र आतून सिनेमातल्या अमिताभसारखे कसे पेटून उठलेले आहेत दरक्षणी तसे मला जाणवायचे दिसायचे,….

2014 पूर्वी माझी त्यांच्याशी बऱ्यापैकी ओळख मैत्री होती पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माझी भूमिका नव्याने पिल्लाला जन्म देणाऱ्या मांजरीसारखी झालेली आहे म्हणजे अमुक एखादा विरोधक मग तो कितीही ताकदवान असला कुठल्याही जाती धर्माचा असला थेट गुंड जरी असला तरी जो कोणी फडणवीसांना संकटात अडचणीत तेही विनाकारण आणेल भलेही तो भाजपाचा जरी असला किंवा माझा त्याआधी जवळचा मित्र जरी असला तरी त्यावर मी त्या मांजर आईसारखा तुटुन पडत असे आजही तुटून पडतो उद्याही माझी भूमिका अजिबात बदलणार नाही कारण फडणवीसांमध्ये 2014 पासून मला थेट मोदी यांचा भास व्हायचा तेच मी जेव्हा बोलून लिहून मोकळा होई; तेव्हा माझी देखील खिल्ली उडविल्या जाते जाई पण फायदा नुकसान संकट इत्यादींचा विचार न करता राज्याचा हा नवा मोदी अवतार त्यासाठी वाट्टेल ते, जसे त्यांच्या काही शैलेश जोगळेकर पद्धतीच्या जिवलगांनी ठरविले तेच मीही पक्के केले. अमिताभ जेव्हा सुरुवातीला सिनेमात आला तेव्हा त्यावेळचा सुपरस्टार राजेश खन्ना त्याला सतत अपमानित करायचा पण पारडे नेमके उलटे फिरले जे हुबेहूब फडणवीस व पवार आणि उद्धवजींच्या बाबतीत घडले, कालचे फडणवीस बघता बघता राजकीय अमिताभ झाले आणि सतत छळणार्या अपमानित करणाऱ्या समस्त काँग्रेसी नेत्यांचा पवारांचा उद्धवजींचा पार राजेश खन्ना झाला….

बघा, एखाद्या सत्ताधीशांच्या आसपास राहतांना फिरकतांना काही फायदे करवून घ्यावे असे प्रत्येकाच्या मनात असते जे माझ्या देखील मनात होते किंबहुना नकळत जवळ असण्याचे फायदे होत असतात पण केवळ व्यवसायातून आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा आर्थिक मजबुतीकरणासाठी किंवा एखादे पद पदरात पाडून घेण्यासाठी विशेषतः मी आणि पत्रकार पुत्र विक्रांत आम्ही दोघांनीही हा विचार मनात बाणला नाही, जबरदस्तीने तोंडात साखर कोंबली म्हणून ती कडू लागत नाही एवढ्यापुर्ती आमची हि भूमिका त्यामुळे प्रसंगी जीव गमावण्याची जरी वेळ आली तरी फडणवीसांमधला मोदी घडविताना त्यात हातभार लावतांना मागे हटायचे नाही जसे आम्ही ठरविले तीच भूमिका त्यांच्या भोवताली जे जमा झाले आहेत त्यांचीही असायला हवी, त्यातल्या एकाचाही हर्षवर्धन पाटील उद्धव ठाकरे होता कामा नये आणि तुमचे सहकार्य देवेन्द्रजी शंभर टक्के डोळ्यात हृदयात साठवत असतात ज्याची ते नक्की दाखल घेतात मग तेही तुमच्या पाठीशी उभे असतात, यापुढे काहीच वर्षे तुमच्या अपेक्षाविरहित सहकार्याची त्यांना नक्की गरज आहे त्यात कोणताही दगाफटका नको, त्यांना दिल्लीत पाठविण्यापूर्वी मोठी ताकद राज्यातून त्यांच्या पाठीशी उभी आहे हे येथल्या समस्त रहिवाश्यांनी नेत्यांनी त्यांच्या आसपासच्या प्रत्येकाने तेही प्रत्यक्ष कृतीतून दाखविण्याची मोठी गरज आहे. आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. फडणवीसांनी आपल्या भूमिकेत बदल करण्याचे नक्की केले आहे जे कदाचित अनेकांना न रुचणारे असेल न पटणारे किंवा थेट शब्दात बोलायचे झाल्यास न परवडणारे असेल कारण त्यावेळेचे देवेंद्र एखाद्या कडक हेडमास्तर सारखे वागतील जे दीर्घकाळ राज्याच्या भल्याचे असेल कदाचित स्वार्थाने जमा झालेल्यांना ते नुकसानदायी असेल पण जर तुमचे फडणवीसांवर मनापासून प्रेम असेल तर कणखर होत तुम्ही सहकार्य करणे आवश्यक ठरते.

मुख्यमंत्री झाल्यानंतर सुधाकर नाईक यांनी देखील कठोर कडक भूमिका घेत हे राज्य बदलवून टाकण्याचा निर्णय घेतला होता पण तो निर्णय त्यावेळेच्या खलनायकाने उलथवून टाकला आणि एखाद्या सिनेमात जसा खलनायकाचा विजय होतो तेच नेमके नाईक विरोधकांच्या त्या खलनायकाच्या बाबतीत घडले होते, बिच्चारे सुधाकर नाईक त्यांना त्यानंतर शरद पवार यांनी पूर्णतः राजकारणातून नोव्हेअर केले त्या धक्क्यातून न सावरलेले सुधाकर नाईक लवकरच देवाघरी गेले. आपल्याला मात्र यावेळी सावध राहायचे आहे नवा उज्वल महाराष्ट्र फडणवीसांच्या हातून घडविण्यासाठी, पुन्हा एकदा नवा सुधाकरराव नाईक जन्माला न घालता किंवा पवार पद्धतीच्या वृत्तींना ताकद न देता जसे एकेकाळी सुरुवातीला काहीसे नरमाईची भूमिका घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी कणखर कठोर भूमिका घेत जगात नाव कमविले आहे, आमचा आपला देवेंद्र देखील अगदी सहज उद्याचा नरेंद्र घडू होऊ शकतो, या मातीतल्या प्रत्येकाने फक्त त्यांच्या पाठीशी पोटच्या लेकरासारखे त्यांना घट्ट बिलगून उभे राहावे….

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सज्जनों की सक्रियता राष्ट्र निर्माण के लिए प्रेरक आर्य चाणक्य के विचार आज भी उपयोगी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mon Jan 6 , 2025
मुंबई :- सज्जनों की निष्क्रियता राष्ट्र के पतन का कारण बनती है, जबकि सज्जनों का सक्रिय होना राष्ट्र निर्माण के लिए प्रेरक होता है, आर्य चाणक्य का यह विचार आज के समय में भी प्रासंगिक है, ऐसा प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया। सेठ गोकुलदास तेजपाल नाट्यगृह में चाणक्य नाटक के 1710 वें प्रयोग के अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!