नागपूर, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात करमणूक उपायुक्त चंद्रभान पराते यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार अरविंद सेलोकर, नायब तहसीलदार आर. के. दिघोळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.