यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख विजयी

यवतमाळ :- यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्रावर झाली. एकून 30 फेरीमध्ये झालेल्या या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उत्तमराव देशमुख विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी डा.पंकज आशिया यांच्याहस्ते त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

मतमोजणी केंद्रावर पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीस टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर मतपेट्या असलेली स्ट्रागरुम उघडी करून मशीनची मोजणी करण्यात आली. एकून 30 फेऱ्यांमध्ये मतदारसंघाची मतमोजणी झाली. त्यात सर्वाधिक मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांना 5 लाख 94 हजार 807 मते मिळाली.

उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे, राजश्री हेमंत पाटील महल्ले (शिवसेना) 5 लाख 334 मते, हरिसींग (हरिभाऊ) नसरू राठोड (बहुजन समाज पार्टी) 17 हजार 396 मते, अनील जयराम राठोड (समनक जनता पार्टी) 56 हजार 390 मते, अमोल कोमावार (हिंदराष्ट्र संघ) 3 हजार 377, उत्तम ओंकार इंगोले (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया- डेमोक्रॅटीक) 2 हजार 975 मते, धरम दिलीपसिंग ठाकूर (सन्मान राजकीय पक्ष) 4 हजार 555 मते मिळाली.

अपक्ष उमेदवारांना पुढीलप्रमाणे मते मिळाली. त्यात डा.अर्जुनकुमार सिताराम राठोड (अपक्ष) 1 हजार 863 मते, प्रा.किसन रामराव अंबुरे 1 हजार 720 मते, गोकुल प्रेमदास चव्हाण 1 हजार 94 मते, दिक्षांत नामदेवराव सवाईकर 1 हजार 103 मते, नुर अली मेहमुद अली शाह 1 हजार 958 मते, मनोज महादेवराव गेडाम 2 हजार 794 मते, रामदास बाजीराव घोडाम 6 हजार 781 मते, विनोद पंजाबराव नंदागवळी 6 हजार 298 मते, संगिता दिनेश चव्हाण 7 हजार 180 मते, संदीप संपत शिंदे 5 हजार 514 मते मिळाली.

एकून 9 हजार 391 मतदारांनी नोटाला मतदान केले तर टपाली मतपत्रिकेतील एकून 71 मते अवैध ठरली. मतमोजणी संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डा.पंकज आशिया यांनी संजय उत्तमराव देशमुख विजयी झाल्याची घोषणा केली व त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले. संपुर्ण मतमोजणीची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दूरदर्शन करणार टी 20 विश्वचषक सामन्यांचे प्रसारण

Wed Jun 5 , 2024
– टी 20 विश्वचषकासाठीच्या विशेष क्रीडागीताचे आणि प्रोमोचे सचिव संजय जाजू आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी केले अनावरण – पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 आणि विम्बल्डन 2024 सह प्रमुख जागतिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे दूरदर्शनवर होणार प्रसारण नवी दिल्‍ली :- वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत 2 जून पासून आयोजित टी 20 विश्वचषकाचे प्रसारण डीडी फ्री डिश प्लॅटफॉर्मवर करणार असल्याचे प्रसार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com