यवतमाळ :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा सदस्य नोंदणी व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन यवतमाळ येथे दिनांक 29 सप्टेंबर 2024 रविवार रोजी राजवाडा पार्क भोसा रोड येथे खासदार संजय देशमुख यांच्या अध्क्षतेखाली करण्यात आले होते . या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना प्रमुख राजेंद्र गायकवाड, सागर पुरी, किशोर इंगळे, जिल्हा प्रमुख संतोष ढवळे आणि यवतमाळ शहर प्रमुख विनोद पवार, कल्पना दरवई, गजानन ठोकाळे, सय्यद दाऊद अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख, अशिफ आली काजी उपजिल्हाप्रमुख, अमान सामाजिक कार्यकर्ता. डॉ. गणेश नाईक, राजेश निमोदीया, संदीप सरोदे उपतालुकाप्रमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवीन सभासद नोंदणी करण्यात आली . तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या प्रकारे विजय मिळावा या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच उपस्थित मान्यवरांनी शिवसेनेच्या कार्यकरत्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राधिका चव्हाण, सचिन पिल्लेवर, गजानन अवदलकर, मनीषा बुटले, संजय रंगे, शोयाब शहा, छोटू पठाण, सुनील पवार, शेख नईम, दत्ता सूर्यावंशी नितीन सोळंकी, आशिम पठाण, सोयेब बेग, यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना उ बा ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा सदस्य नोंदणी व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com