नागपूर :- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेमधून लाडकी बहीण योजना सुरू केली, यावर्षी महिलांना रक्षाबंधन निमित्ताने पहिला हप्ता डीबीटी द्वारे वितरित करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तसेच ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा तीर्थयात्रा योजना सुरू केलेली आहे, अशा अनेक योजना कल्याणकारी योजना सुरू करून ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना युवकांना विकासाच्या प्रवाहात आणले राज्यभरातील बचत गट तसेच अनेक चळवळीतील महिलांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या सुद्धा पाठवण्यात आल्या जसे बोलतात तसे करून दाखवतात हा शब्द तंतोतंत एकनाथ शिंदे यांनी पाळलेला आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व महिला भगिनी अत्यंत आनंदात व समाधानी असल्यामुळे ही योजना नेहमी करताच सुरू राहणार आहे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी महाराष्ट्रातल्या सर्व बहिणी ठामपणे उभ्या आहेत आणि आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे अशा भावना नागपूर मधल्या महिलांनी व्यक्त केला. आमदार डॉ.मनीषा कायंदे, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनामध्ये , जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर यांनी रक्षाबंधन निमित्ताने महिलांच्या खात्यामध्ये ३,०००/ रुपये आले अशा महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला, महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मिळालेल्या पैशातून आवश्यक असलेल्या वस्तूची खरेदी करून रक्षाबंधन आनंदात साजरा केला, महिलांच्या चेहऱ्यावरचा हास्य व समाधान चेहऱ्यावर दिसत होतं. यावेळी जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर, जिल्हाप्रमुख मीना जालेकर उपजिल्हा संघटिका मंजुषा पानबुडे, शहर प्रमुख रूपाली बोकडे, विभाग प्रमुख नंदा खोब्रागडे, प्रभाग प्रमुख मोना शेंडे,विभा टेंबुलकर, विजयश्री ढेंगे, सुनिता हिंगवे, कुंदा चुटे, सारिका बांन्ते, समिक्षा वाघाडे, कमला वाघाडे, योगिता दौड, शितल मोहल्ले, प्रिती वानखडे, राज अंबादे, गौरी वर्मा, सिमा शुक्ला, नेव्हा लांजेवार, यशोदा वासनिक, बबिता मेश्राम, अनुसया मेश्राम, रुपाली मेश्राम, भाग्यश्री मेश्राम, पायल टेकाम, ललिता खराबे, निशा बांन्ते, प्रमिला वायकोडे, कविता खापेकर, आरती चौधरी, रसिका आदमे, सोनाली बिजनेस, स्वाती बिसेन, मनाली शाहारे, वनिता आंबोने, चंचल वाट, साधना शिरसागर, वर्षा अंबुलकर, श्वेता तलवारे, कुंदाबाई आग्रे, देविका डोंगरे, गायत्री शुक्ला, अनुसया झाडे, कविता पोटफोडे, ललीता डव आदी महिला उपस्थित होत्या.
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचा साडीचोळी देऊन शिवसेना महिला आघाडी नागपूर तर्फे सत्कार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com