संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4 – आज कोराडी येथील भाजपा प्रदेशाध्यक्ष . चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे कन्हान येथील शिवसेना नेते माजी ग्रामपंचायत सदस्य मोतीलाल हारोडे यांचा व कार्यकर्त्यांनचा मा चंद्रशेखरजी बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते प्रवेश झाला.या वेळी गोंडेगाव येथील सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष ढोकरिमारे, कन्हान येथील पूनम राठी, कांद्री येथील तनुश्री आकरे, गोंडेगाव येथील आरती वगारे यांचा भाजपा मधे प्रवेशाबद्दल मा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्कार सुद्धा केला, प्रमुख उपस्थित मधे व्यंकटजी कारेमोरे जिल्हा परिषद सदस्य, आशाताई पणिकर कन्हान नगर परिषद माजी नागराध्यक्षा, नरेश मेश्राम पंचाय समीती सदस्य, जयराम मेहरकुळे मंत्री भाजपा नागपुर ग्रा., रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर ग्रामीण, सरिता लसुंते अध्यक्ष भाजपा महिला आघाड़ी पारशिवनी तालुका, शैलेश शेळके संपर्क प्रमुख भाजपा पारशिवनी,प्रवेश घेणाऱ्या मधे दीपक अरुनकर, अर्चना गजबे, मंजू लक्षणे, सह विनोद किरपान, मयूर माटे, अमन घोडेस्वार, सचीन वासनिक इत्यादि भाजपा कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.