– कार्यमुक्त करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
कोदामेंढी :- तालुक्याचे ठिकाण मौदा येथे राहणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांनी आज 3 नोव्हेंबर रविवारला राजीनामा देण्याचे पत्र त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील स्टेटस वर टाकले आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कार्यमुक्त करण्याची मागणीही केलेली आहे .विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून कामठी विधानसभाचे शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख यांच्या राजीनामामुळे शिवसेना (उबाठा) महाआघाडीच्या प्रमुख घटक पक्ष असल्याने महाआघाडीला धक्का बसण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. गोडबोले आता त्याच पक्षात राहतात की इतर पक्षात प्रवेश करतात याकडे मौदा तालुक्यासह कामठी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील राजकीय लोकांचे तसेच जिल्ह्यातील ,राज्यातील नेत्यांचे लक्ष वेधले आहे.