रनाळा येथे युवा चेतना मंच तर्फे शिवजयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती युवा चेतना मंच तर्फे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती श्री शिव नित्य पुजन समीती यांच्या सयुक्त विद्यमानाने सकाळी ७.३० वाजता रनाळा चौक येथे विधीवत पूजन करूण महाराजांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी सामूहिक शिवस्तुती घेण्यात आली तसेच सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कामठी येथे महाराजांचे रूद्राभिषेक करून विधीवत पूजन करण्यात आले व सामूहिक शिवस्तुती घेण्यात आली. रनाळा येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रनाळा गावाचे पोलीस पाटील विशाल आमधरे वरीष्ठ शिक्षक मधुकर गिरी, भा. ज. पा. ग्रामीण महामंत्री अतुल ठाकरे, सेवानिवृत्त बीएसएफ सैनिक शेषराव अढाऊ, पटवारी कैलाश भिंडे, युवा चेतना मंच नागपूर जिल्हा ग्रा. चे उपाध्यक्ष अतुल चोरघडे , दिव्यांग फाऊंडेशन चे सचिव बाॅबी महेंद्र प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी सामूहिक शिवस्तुती व सामूहिक शिव -ललकारी घेण्यात आली . विशेष आकर्षण म्हणुन युवा चेतना मंच बाल आखाडा तर्फे बालकांचे लाठी-काठी शिवकालीन प्रात्यक्षिक व लेझिम पथकाद्वारे शिवकालीन नृत्य सादर केले तसेच छ. शिवाजी महाराज यांची वेशभूषा धारण करून महाराजांच्या जीवना वर प्रकाश टाकले हे विशेष आकर्षण बनले याप्रसंगी नुपूर अग्निहोत्री, प्रियांशी कुशवाह, श्रुती धूर्वे, चांदणी महीलांगे, प्रतीक्षा भलावी, साक्षी मरजिवे, प्रीती भानारकर, श्रवणी धुर्वे, आराध्या अढाऊ, रेवंत अढाऊ, सुभश्री भावे, विहा अढाऊ, वंश हीवरेकर या शिवभक्तांनी शिवकालीन प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमाचे संयोजन युवा चेतना मंचचे शिव उत्सव प्रमुख मयुर गुरव, सह- प्रमुख कुणाल सोलंकी ,भूषण ढोमणे , युवा चेतना मंच बाल आखाडा प्रमुख डॉ . निखील अग्निहोत्री व प्रिती हीवरेकर, नम्रता भावे, संगीता अढाऊ यांनी केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय खोपे तर आभार प्रदर्शन हिमांशू लोंढेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा.पराग सपाटे, अमोल नागपुरे, हितेश बावनकुळे, प्रफुल्ल बावनकुळे, प्रफुल्ल सिगांडे, आदी नी परीश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गंजीपेठ येथे बनणार नवीन अत्याधुनिक अग्निशमन केंद्र

Wed Feb 19 , 2025
– मनपा आयुक्तांनी दिली अग्निशमन केंद्राला भेट नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता. १८) गंजीपेठ अग्निशमन केंद्राची पाहणी केली. गंजीपेठ अग्निशमन केंद्राची इमारत जीर्ण झालेली असून त्या जागेवर नवीन अत्याधुनिक अग्निशमन केंद्राचे बांधकाम प्रस्तावित आहे. अग्निशमन केंद्राच्या पाहणी प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त सर्वश्री अशोक गराटे, गणेश राठोड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!