संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती युवा चेतना मंच तर्फे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज नित्य पुजन समीती, हिंदू जागरण मंच यांच्या सयुक्त विद्यमानाने सकाळी ७ वाजता कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांचे अभिषेक करून विधीवत पूजन करूण महाराजांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी सामूहिक शिवस्तुती घेण्यात आली तसेच सकाळी ९ वाजता रनाळा चौक येथे महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विधीवत पूजन करण्यात आले व सामूहिक शिवस्तुती घेण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रनाळा ग्रामपंचायत सरपंच पंकज साबळे, उपसरपंच अंकीता तळेकर, वरीष्ठ शिक्षक राजेंद्र चवरे. वरिष्ठ शिक्षक अतुल ठाकरे ,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे , मयुर गणेर, स्वप्निल फुकटे, मंगला ठाकरे, ज्येष्ठ शिक्षिका रंजना अग्निहोत्री प्रामुख्याने उपस्थित होते . याप्रसंगी सामूहिक शिवस्तुती व सामूहिक शिव -ललकारी घेण्यात आली . विशेष आकर्षण म्हणुन युवा चेतना मंच बाल आखाडा तर्फे बालकांचे लाठी-काठी शिवकालीन प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण बनले याप्रसंगी क्षितिज अग्निहोत्री, , प्रथम सपाटे, खुशी राँय ,पूर्वी रॉय, रणबिर राँय , नुपूर अग्निहोत्री राशी पांडे ,ईशांत चकोले ,नैतिक घटोळे, अथर्व बडगे , आराध्य अमृतकर , रूद्राक्क्षी बावनकुळे ,जानवी पोचपोगंडे , वंशिका ठाकरे, साक्षी मर्जीवे ,चांदनी महीलांगे , प्रतिक्षा भलावी ,माउली भावे, आरव अढाऊ या शिवभक्तांनी शिवकालीन प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमाचे संयोजन युवा चेतना मंचचे शिव उत्सव प्रमुख मयुर गुरव, सह- प्रमुख कुणाल सोलंकी ,भूषण ढोमणे , युवा चेतना मंच बाल आखाडा प्रमुख डॉ . निखील अग्निहोत्री यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय खोपे तर आभार प्रदर्शन नम्रता अढाऊ यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा.पराग सपाटे, बॉबी महेंद्र , अमोल नागपुरे, शेषराव अढाऊ, हितेश बावनकुळे, लक्ष्मीकांत अमुतकर, नरेश सोरते, नितीन ठाकरे, प्रफुल्ल बावनकुळे, प्रफुल्ल सिगांडे, कमलाकर नवले, आशिष हिवरेकर, श्रीकांत मुरमारे अमोल श्रावणकर, तौशिक बावणकर, पंकज ढोमणे, उमेश गीरी , राजेश मौर्या, रूपेश चकोले, आदी नी परीश्रम घेतले.