संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती युवा चेतना मंच व कामठी महीला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी महीला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बैंक येथे बैंकेचे संचालक नितीन ठाकरे, पालक संचालक नरेश सोरते, दिव्यांग फाऊंडेशनचे सचिव बाॅबी महेंद्र, जेष्ठ नागरिक कुमुद सगदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.याप्रसंगी सामुहिक पुजन व शिव स्तुती घेण्यात आली. याप्रसंगी सुत्रसंचलन प्रा पराग सपाटे व आभार प्रदर्शन हिमांशू लोंडेकर यांनी केले.याप्रसंगी भाग्यश्री पटले, योगेश्वरी तडसे , मोनिका गंगापारी , हर्षलता पाटील, धनश्री तुपकर , विशाखा भिमटे, अभिलाष बंड, सुर्यकांत पौनीकर,सुरेंद्र भक्ता उपस्थित होते.