– राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) कन्हान शहर व पारशिवनी तालुका तर्फे आयोजन.
कन्हान :- राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद पवार यांच्या वाढदिवस राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कन्हान शहर व पारशिवनी तालुका तर्फे मुकबधिर शाळा कांद्री येथे केक कापुन व विद्यार्थ्याना बिस्किट, फळ वाटुन थाटात साजरा करण्यात आला.
गुरूवार (दि.१२) डीसेंबर २०२४ ला राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद पवार यांच्या वाढदिवसी राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कन्हान शहर व पारशिवनी तालुका तर्फे बोरडा, नगरधन रोड वरील अजनाबाई रंगारी मुकबधिर शाळा कांद्री येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष (शरद पवार) नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष किशोर बेलसरे यांच्या अध्यक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापुन विद्यार्थ्यांना बिस्किट, फळ वाटप करून वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी रामटेक विधानसभा अध्यक्ष गणेश पानतावणे, तालुकाध्यक्ष पुरणदास तांडे कर, कन्हान शहराध्यक्ष अभिषेक बेलसरे, ज्ञानेश्वर विघे, श्रीराम नांदुरकर, देविदास तडस आदी प्रामुख्या ने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता डॉ कमलेश शर्मा, सतिश बेलसरे, संजय तिवसकर, विष्णु बेहरा, अमित बेलसरे, पवन पिल्ले, नयन गायकवाड, राहुल बारोंदे, आकाश वाघमारे सह मुकबधिर शाळेती ल मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि विद्यार्थी आदीने सहकार्य केले.