शंखनांद विधानसभा -2024 – लक्ष्य रामटेक विधानसभा 2024 पदाधिकारी मंथन बैठक थाटात

रामटेक :- रविवारी झालेल्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा च्यावतीने रामटेक येथील गंगा भवन येथे रामटेक विधानसभा -2024 च्या अनुषंगाने पदाधिकारी मंथन बैठक रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांच्या नेतृत्वात मोठ्या थाटात पार पडली. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडून रामटेक लोकसभेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भरगोस मतांनी विजय प्राप्त केला. आता लक्ष्य रामटेक विधानसभा 2024 असून शिवसेना पक्षाने रणशिंग फुकले आहे. पक्ष वाढीच्या दृष्ठिकोनातून व सामान्य जनतेच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी शिवसेना पक्ष निकडीने उभा राहील. गावा-गावात जाऊन पक्षाचे कार्य वाढविणे, आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवणे, रामटेक विधानसभा हा शिवसेनाचा गड असून ही 2024 विधानसभा शिवसेना मोठ्या ताकतीने लढून रामटेक विधानसभेवर विजय प्राप्त करेल त्यासाठी शिवसेनेचे कठीबद्ध नियोजन असेल व या विधानसभेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून विशालभाऊना आमदार करण्यासाठी आपण सर्वांनी तयारी लागायला पाहिजे त्या आपल्या जीवाचे रान करून विधानसभेवर भगवा फडकवू अशा असंख्य बाबिवर साधक बांधक चर्चा या मंथन बैठकीच्या माध्यमातून पक्षाच्या प्रमुख मान्यवरानी व्यक्त केल्या.

बैठकीला शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक सागर डबरासे, जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले व उत्तम कापसे, युवासेना कार्यकारनी सदस्य हर्षल काकडे, महिलासेना जिल्हाप्रमुख  दुर्गा कोचे, युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख अपूर्वा पितट्टलवार, उपजिल्हा प्रमुख प्रेम रोडेकर, विधानसभा सहसंपर्क प्रमुख सूत्तम मस्के, विधानसभा सल्लागार प्रमुख अरुण बनसोड, विधानसभा संघटक रमेश तांदूळकर, जेष्ठ शिवसैनिक रातीराम मामा रघुवंशी, रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखांद्रे, पारशिवानी तालुका प्रमुख कैलास खंडार, मौदा तालुका प्रमुख हरिभाऊ लोहबरे,रामटेक महिला तालुका प्रमुख सौ.कलाताई तिवारी रामटेक शहर प्रमुख बादल कुंभलकर, रामटेक तालुका संघटक अनिल येळणे, मौदा तालुका संघटक नरेश भोंदे, कांद्री शहर प्रमुख सुरेश आंबिलडूके, उपतालुका प्रमुख देवराव ठाकरे, देवेंद्र कोहळे, योगेश्वरी चोखांद्रे, प्रमोद बरबटे, प्रकाश निमकर सह मान्यवर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी मौदा, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील पक्षाचे रिक्त पद वाटप करून तिन्ही तालुक्यातील असंख्य युवक, महिलांनी पक्ष प्रवेश केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला

Wed Jun 12 , 2024
– रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारला पदभार नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील चार नवनिर्वाचित खासदारांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर सोपविलेल्या खात्यांचा कार्यभार आज स्विकारला. या मंत्र्यांमध्ये रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सहकारिता मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा स्वीकारला पदभार-  मुरलीधर मोहोळ यांनी सहकारिता मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आज स्विकारली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com