संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- नांदगाव (येसंबा) येथे जय तुर्रा प्रकाश मंडळव्दारे शाहीर लोककलावंताचा मेळाव्यात भारतीय कलाकार शाहीर मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष व मानधन समिती सदस्य शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.
नुकताच ग्रामिण भागातील नांदगाव (येसंबा) येथे ग्रामिण भागातील खडी गम्मत, दंडार, डहाका च्या लोक कलावंताचा मेळावा आयोजित करून ग्रामिण भागातील वाईट प्रथा, सामाजिक समस्येचे निराकरण करण्या विषयी लोकांचे मनोरंजत्मांक प्रबोधन करून जनजागृती करण्यास शाहीर, लोक कलावंताना ही पुरातन ग्रामिण लोककला जतन करून जोपसणा करण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. शाहीर लोक कलावंतानी विविध लोककला सादर करून उपस्थितांचे प्रबोधत्मांक मनोरंजन केले. याप्रसंगी भारतीय कलाकार शाहीर मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष व मानधन समिती सदस्य शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा ग्रा.प. नांदगाव सरपंच गेंदलाल देशभ्रतार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महारा ष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने शाहीर, लोक कलावंताना भरीव सहकार्य करावे. सध्या ग्रामिण लोक कलाकार यांना २२५० रुपये मानधन मिळत असुन हे तुटपुंजे असल्याने शासनाने लोक कलावंत शाहीर कलाकार यांचे मानधन वाढवुन त्याच्या विविध समस्या सोडवाव्या अशी मागणी सत्काराला उत्तर देतानी केली . यावेळी उपसरपंच सिंधु उके, शाहीर भगवान लांजेवार, चीरकुट पुंडेकर, गजानन वडे, विक्रम वांढरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. शाहीर, लोक कलावंताच्या मेळाव्याच्या यशस्वितेकरिता आयोजक शाहीर मधुकर शिंदेमेश्राम, बंडू सरवरे, नामदेव गावंडे, दीपक दिवटे, शाहीर देवराव बाधुके, छंनु टेकाडे,संदीप तेलंग, युवराज बाधुके, विलास रच्छोरे, पुसाराम बांगडे, गुणवंत डेंगे, आकाश बावनकुळे, गिरिधर बावणे, जितु शिंदे, शालिकं शेंडे, किसन वडे, मारोती वानखेडे, संजय ठाकरे, नागेश उके, राजेश ठाकरे, सुधाकर शिंदे, तुळशीराम टोहणे, सचिन खंडाते, दिलीप, दुर्गेश, रवि, प्रभाकर, शुभम, दीपक आदीनी परिश्रम घेतले.