भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्र सुरु

– शेतकरी नोंदणीसाठी मोबाईल ॲप

यवतमाळ :- खरीप पणन हंगामांतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका व रागी या भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी जामणी, पुसद व आर्णी हे खरेदी केंद्र असून नव्याने राळेगांव व कळंब या 2 खरेदी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे. या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दि.31 मे पर्यंत सुरु राहणार आहे.

खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, राळेगांव तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती राळेगांव, कळंब तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती कळंब या केंद्रांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्यांचा सातबारा आहे, त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. शेतकरी नोंदणी मोबाईल ॲपद्वारे होत असून लाईव्ह फोटो देखील या अँपद्वारे अपलोड करता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करुन नोंदणी करावी.

शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर स्वत: हजर राहून किंवा स्वत: मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह फोटो अपलोड करावा. ज्वारी, मका व रागी हे भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दि.31 मे पर्यंत तर खरेदी दि.30 जूनपर्यंत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेची आदरांजली

Tue May 28 , 2024
नागपूर :- अतुल्य साहस आणि असीम राष्ट्रभक्ती, मृत्यूलाही न जुमानणारी प्रचंड ध्येयाशक्ती, समुद्रालाही शरण आणणारी निर्भीडता, हजारो क्रांतिकारकांची प्रेरणा, स्वातंत्र्य क्षितिजावरील सूर्य, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेचे केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वीर सावरकरांच्या तैलचित्राला आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, सहा. आयुक्त महेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com