सेवापंधरवड्यात शिधापत्रिका संदर्भातील सर्व तक्रारींचा निपटारा – नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

नागपूर :-  सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत, या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित संदर्भ,अर्ज,तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘सेवा पंधरवाडा’ राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या पंधरवड्यात शिधापत्रिकेसंदर्भातील सर्व सेवा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.

सेवा पंधरवड्यात आपले सरकार वेबपोर्टलवरील संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हास्तरावरील प्रलंबित असलेल्या शिधापत्रिकाबाबत सर्व अर्जाचा मोहिम स्वरुपात निपटारा करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या शिधापत्रिकाबाबत सर्व सेवाविषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्यात येणार आहे. या मोहिमेचा जनतेने लाभ घ्यावा.

सेवा पंधरवड्याच्या कालावधीमध्ये पुरवठा विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटूंब योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकाचे वितरण करणे, नविन शिधापत्रिका तयार करणे, दुय्यम शिधापत्रिका उपलब्ध करुन देणे, तसेच शिधापत्रिकेतील नावे कमी जास्त करणे, आधार क्रमांक नसलेल्या लाभार्थ्याचे e-kye करणे ही कामे प्रामुख्याने करण्यात येणार आहे. मरण पावलेल्या लाभार्थी तसेच लग्न झालेल्या मुलीबाबत RC अद्यावत करणे, तसेच कूमी झालेल्या RC मध्ये नवीन नावे संलग्न करणे प्राप्त झालेला इष्टांक पुर्ण करणे इत्यादी सेवा पुरवठा विभागामार्फत दिल्या जाणार आहे.

तसेच जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी पुरवठा विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी दैनंदिन आढावा घेणे, शिबिरे आयोजित करणे, गावात दवंडी देणे तसेच क्षेत्रिय भेटी देणे अशा प्रकारच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी, नागपूर यांनी सर्व नि.अ/पु.नि यांना दिल्या असून ज्या लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले नाही, अशा लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदारांकडे जावून E-kye द्वारे आधार सिडींग करुन घ्यावे. आपले मोबाईन नंबर शिधापत्रिकाशी संलग्न करुन घ्यावे, याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जनतेला आवाहन केले आहे. लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिधापत्रिका सेवाविषयक बाबीबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहचावी व लाभार्थ्यांना विभागामार्फत योग्य सहकार्य व्हावे, यासाठी पात्र लाभार्थ्यांनी तालूका कार्यालयास संपर्क करण्याचेही आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जात पडताळणीचे अर्ज आपआपल्या महाविद्यालयातच सादर करा  - सुरेंद्र पवार

Sun Sep 18 , 2022
384 महाविद्यालयासाठी महत्त्वाची सूचना नागपूर :-  384 महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे जात पडताळणी अर्ज परिपूर्ण स्थितीत कसे स्विकारावे, त्रृटी कशी पूर्ण करावी, याबाबत प्रशिक्षण झाले आहे. त्यामुळे बारावीत असणाऱ्या जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज महाविद्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा जातपडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त सुरेंद्र पवार यांनी केले आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी 11 व 12 वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच स्विकारण्यात येईल. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com