संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावी परीक्षेचा ऑफलाईन निकाल ८ जूनला जाहीर झाला. एस के पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८०.२३ %लागला असून
विज्ञान शाखेत ३९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी ३८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.नेहमीप्रमाणेच महाविद्यालयाने विज्ञान शाखेत उच्चाक कायम राखला.विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९८.७३टक्के तर वाणिज्य शाखेचा ७२.१५ तर कला शाखेचा ६३.७१ लागला असून महाविद्यालयाची एकूण टक्केवारी ८०.७१.टक्के लागला.विज्ञान शाखेतून कु हर्षिता महेश शर्मा ही प्रथम आली असून तिला ९४.१७ तर तौफिक सना मोहोम्मद द्वितीयअसून तिला ८८.१७ तर गरीमा रामकुवर शर्मा तृतीय आली तीला ८५.८७ असून टक्के मिळाले.
वाणिज्य शाखेतून द्विवेदी मुस्कान प्रवीण कुमार प्रथम ९१.१७, विवेक मनोज नानकाणी द्वितीय तर समीक्षा लक्ष्मीकांत
बोंडे तृतीय असून तीला ८८.८३टक्के गुण मिळाले आहेत.कला शाखेचा निकाल ६३.७१%लागला असून रेश्मा वसंत कोडवते प्रथम , फातिमा शेख जावेद द्वितीय तर शीला गोपाल कुशवाह तृतीय आली असून सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ. विनय चव्हाण व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनीता भौमिक, पर्यवेक्षक प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी अभिनंदन केले आहे.