ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. 5 : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

            शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिवंगत सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही दिवंगत सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

            पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.

            दिवंगत सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

आदर्श गाव योजनेत समाविष्ट गावामध्ये कृषी विभागाच्या योजना राबवा - कृषिमंत्री दादाजी भुसे

Wed Jan 5 , 2022
 मुंबई, दि. 5 : आदर्श गाव योजनेत सहभागी असलेल्या गावांमध्ये कृषि योजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रशासनाला दिली.             आदर्श गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव  पवार, कृषि सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरजकुमार, सहसचिव (जलसंधारण) सुभाष गावडे, संचालक (जलसंधारण) श्री. शिसोदे, अवर सचिव (मृद व जलसंधारण) शुभांगी पोटे, आदर्श गाव समितीचे कृषि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com