थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी मैदानात

नागपूर :- वीज ग्राहकांकडे बिलापोटी असलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी देखील मैदानात उतरले असून ग्राहकांकडे प्रत्यक्ष जाऊन यांच्याकडील थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन देखील ते करीत आहेत.

महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक हे मागिल काही दिवसांपासून दररोज विविध भागांतील कार्यालयांना भेट देत थकबाकी वसुलीसाठी कर्मचा-यांना प्रोत्साहीत करीत आहेत सोबतच तत्पर वीज जोडणी आणि इतरही तांत्रिक गोष्टींचा आढावा घेत आहेत. राजेश नाईक यांनी बुधवारी कन्हान, रामटेक, कामठी, मनसर याभागातील थकबाकीदार ग्राहकांना प्रत्यक्ष भेटी देत त्यांना थकबाकी भरण्याचे देखील आवाहन केले. नाईक यांच्यासमवेत कार्यकारी अभियंते व इतर अभियंते व कर्मचारी देखील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. ग्राहकांकडून संपुर्ण थकबाकी 31 ऑगस्ट पूर्वी वसूल करण्याच्या सूचना देखील त्यांनी सर्व संबंधितांना दिल्या. उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता चंदन तल्लरवार यांनी देखील आज उमरेड भागातील थकबाकी वसुलीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला.

नागपूर ग्रामिण मंडलासोबतच शहर मंडलाने देखील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरु केली आहे. कॉग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमराज ढोके यांनी आज बुधवारी गोधनी, बोकारा आणि सभोवतालच्या भागातील ग्राहकांसोबत संवाद साधून थकबाकी भरण्याचे आवाहन केले, सोबतच थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करणा-या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या.

थकबाकी वसुलीसाठी महावितरणतर्फे धडक मोहीम राबविण्यात येणार असून ग्राहकांनी त्यांच्याकडील वीजबिलाचा भरणा वेळीच करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.  –

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आम आदमी पार्टी नागपूरने चंद्रयान तीन मिशन यशस्वी झाल्याचा केला जल्लोष

Thu Aug 24 , 2023
नागपूर :-दिनांक 23 ऑगस्ट, 2023 रोजी सुमारे सायंकाळी 6 वाजता इस्रोचा चंद्रयान-3 मिशन हा यशस्वी झाला. हा मिशन इस्रोच्या वैज्ञानिकांनी अथक प्रयास करून यशस्वी करून दाखविला. आम आदमी पार्टी नागपूरच्या वतीने रमन सायन्स सेंटर समोर व आगारामदेवी चौकात चंद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्याबद्दल मिठाई वितरित करण्यात आली. यावेळी ढोल ताशा वाजून जल्लोष देखील करण्यात आला. सर्व सर्व नागरिकांना मंगलयान -3 यशस्वी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!