नागपूर :-सुप्रसिद्ध फुले आंबेडकरवादी कवी प्रा.यशवंत मनोहर यांचे पोएट्री पोर्ट्रेट नानू नेवरे यांनी मध्यंतरी त्यांच्या कॕमे-याने चितारले होते. ते मनोहर यांना खूपच आवडले होते. तशी मोकळी दाद यशवंत मनोहर यांनी कॕमे-याचा जादूगार नानू नेवरे यांना दिली होती. दरम्यान नागपूरला आले असताना, यशवंत मनोहर यांच्याकडे राजकारणातील भिष्माचार्य शरद पवार यांनी सदिच्छा भेट दिली. महत्त्वाच्या साहित्यिकांविषयी, कलावंतांविषयी शरदचंद्रजींच्या मनात अकृत्रिम जिव्हाळा आहे. आपुलकी आहे. मनोहर यांचे कडील सदिच्छा भेटीत नानू नेवरे यांनी चितारलेले पोएट्री पेंटिंग मनोहर यांनी पवार यांना दाखविले. नानू नेवरे यांनी अलीकडे विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनाचे चित्रण करणारी छायाचित्रांची मालिका निर्माण केली. शेतकऱ्याचे विषण्ण करणारे जगणे आणि मरणे हा या चित्रमालिकेचा विषय आहे. नुकतेच या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॕलरीत आयोजित करण्यात आले होते. त्या छायाचित्रांचा अल्बमही मनोहर यांनी नानू नेवरे यांच्या उपस्थितीत पवार यांना दाखविला. नेवरे यांचे कलात्मक आणि हृदयाला हात घालणारे काम बघून पवार हे खूपच प्रभावित झाले. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखही या क्षणाचे साक्षीदार झाले होते.
ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केले नानू नेवरे यांच्या छायाचित्रकारितेचे कौतुक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com