नोंदणीसाठी 12 जानेवारी शेवटची तारीख
खासदार क्रीडा महोत्सव 2023
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा आणि ओ वुमनिया ला रविवारी 15 जानेवारी 2023 ला सुरुवात होईल. रविवारी सकाळी 6 वाजता व्हीएनआयटी येथे ज्येष्ठ नागरिक स्पर्धा सुरु होतील. तर धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर सायंकाळी 5.30 वाजता ओ वुमनिया स्पर्धेला सुरूवात होईल.
दोन्ही स्पर्धांच्या नोंदणीसाठी उद्या गुरूवार 12 जानेवारी 2023 रोजी शेवटचा दिवस असून जास्तीत जास्त महिला व ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून यंदा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी साठी विशेष स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्यानुसार रविवारी महिलांच्या ज्येष्ठांच्या स्पर्धा आणि ओ वुमनिया घेण्यात येतील. व्हीएनआयटी येथे सकाळी 6 वाजतापासून ज्येष्ठांच्या विविध स्पर्धा रंगतील. ओ वुमनिया अंतर्गत यशवंत स्टेडियमवर सायंकाळी 5.30 वाजता महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील नागरिकांनी दोन्ही स्पर्धास्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.