समाजकार्य महाविद्यालय कामठी येथे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनात सामुदायिक नेत्यांची भूमिका या विषयावर परिसंवाद

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  येथील समाजकार्य महाविद्यालयात इंटरनल कॉलिटी ॲसुरन्स सेल, समाजकार्य महाविद्यालय कामठी, रुदया संस्था गडचिरोली, माजी विद्यार्थी संघटना, समाजकार्य महाविद्यालय कामठी, सेंटर फॉर पीपल कलेक्टिव्ह ऑर्गनायझेशन, नागपूर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्टेक होल्डर्स मीटच्या माध्यमातून समाजकार्य महाविद्यालय कामठी येथे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनात सामुदायिक नेत्यांची भूमिका या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

प्रस्तुत परिसंवादात दोन सत्र घेण्यात आले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या प्राचार्या डॉ. रुबीना अन्सारी होत्या तर उद्घाटक म्हणून रुदया सामाजिक संस्था, गडचिरोलीचे संचालक काशिनाथ देवगडे होते. प्रमुख वक्ते म्हणून धनंजयराव गाडगीळ इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट नागपूरचे  संचालक सुरेश पी.एन, स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय, नागपूरचे प्राचार्य डॉ. श्रीपाद नायब, समाजकार्य महाविद्यालय कामठीचे आयक्यूएसी इन्चार्ज प्रा. डॉ. निशांत माटे यांची उपस्थिती  लाभली होती.

दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी सेंटर फॉर पिपल्स कलेक्टिव संस्थेचे संचालक प्रवीण मोते हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे माजी सहयोगी प्राध्यापक रोहित जैन, शंकर बर्डे ग्रामसभा अध्यक्ष वडाळा चंद्रपूर, गुरुदास सेमेस्कर संचालक संदेश गडचिरोली, विनोद गजभिये सामुदायिक नेते, नवीन तोतलाडोह वडांबा, रोशन सावतवान, ग्रामसभा अध्यक्ष चिखली तुमसर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष पवन श्रीवास्तव, भारतीय आदिम जाती सेवक संघाचे समन्वयक सविता करडे, नवयुवक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय नंदनवार, आयसीडीएस अंगणवाडी सेविका विशाखा हाडके, मीनाक्षी गाढवे यांची उपस्थिती लाभली होती. यासोबतच जल, जंगल, जमीन या संसाधनावर उपजीविका करणाऱ्या आदिवासींना त्यांचे हक्क व अधिकार प्राप्त करून देण्यासाठी नागपूर, वर्धा, चंद्रपूर,भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील आदिवासी समुदायातील सामुदायिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिसंवादास सहभागी होते. या परिसंवादात नैसर्गिक संसाधनावर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे अशा आदिवासी समुदायांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी समाज कार्यकर्त्यांची काय भूमिका असावी व  शाश्वत विकासासाठी नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व जतन करणे किती महत्त्वाचे आहे यावर सर्वांनी प्रकाश टाकला.

समाजकार्य महाविद्यालयातील समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी व परंपरागत जीवन जगणाऱ्या वनपरिक्षेत्रातील समुदायांच्या हक्क अधिकारांसाठी वेळोवेळी सहकार्य केले पाहिजे. आदिवासी, परंपरागत समुदायाच्या उत्थानासाठी विद्यार्थ्यांनी या समुदायांमध्ये क्षेत्रकार्य करावे व समाजकार्य महाविद्यालय आणि आदिवासी समुदाय यांना जोडणारा दुवा म्हणून भूमिका पार पाडावी,नैसर्गिक संसाधनाच्या  संरक्षण-संवर्धनाकरिता व शाश्वत सामुदायिक विकासाकरिता समाजकार्य विद्यार्थ्यांची काय भूमिका राहील, दुर्गम भागातील आदिवासी व अन्य परंपरागत समुदाय यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनासाठी समाजकार्य महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक दुवा म्हणून पुढे कार्य केले पाहिजे इत्यादी मुद्द्यावर सखोल विचारमंथन झाले. या प्रसंगी समाजकार्य महाविद्यालय दुर्गम भागातील समुदायाच्या विकासासाठी एक ब्रिज म्हणून सातत्याने कार्य करीत राहील असे आश्वासन प्राचार्या डॉ. रुबीना अंसारी यांनी दिले.

प्रस्तुत परिसंवादामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया,भंडारा, वर्धा व नागपूर या सहा जिल्ह्यातील जल जंगल जमीन या क्षेत्रात काम करणाऱ्या समुदायातील कार्यकर्त्यांनी आपले अनुभव कथन केले.

परिसंवादाचे प्रास्ताविक डॉ. निशांत माटे यांनी केले संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम व डॉ. मनोज होले यांनी केले तर आभार प्रा. राहुल जुनगरी व डॉ. मनीष मुडे यांनी मानले. परिसंवाद विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा गोंदिया नागपूर या सहाही जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधनावर कार्य करणारे प्रतिनिधी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिसंवादाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रणाली पाटील, प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. ओमप्रकाश कश्यप, डॉ. मनोज होले, डॉ. सविता चिवंडे, डॉ. निशांत माटे, प्रा. शशिकांत डांगे, डॉ. मनीष मुडे, डॉ. हर्षल गजभिये, प्रा.राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके, प्रा. गिरीश आत्राम, प्रा. आवेशखरणी शेख  शिक्षकेतर कर्मचारी प्रफुल्ल बागडे, उज्ज्वला मेश्राम, गजानन कारमोरे, प्रतीक कोकोडे,किरण गजभिये, वसंता तांबडे,शशील बोरकर, नीरज वालदे, राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वीज ग्राहकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणारे स्मार्ट मीटर लवकरच कार्यरत

Thu Oct 19 , 2023
मुंबई :- वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com