नाल्यांवरील सेल्फी पॉईंट दर्शविताहेत नागपूर शहराची ओळख स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूरसाठी महत्वाचा पुढाकार

नागपूर : नागपूर शहरातील नाल्यांमध्ये कचरा टाकला जाउ नये, नाले स्वच्छ असावेत यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. मनपाच्या या स्तूत्य पुढाकारामुळे नाल्यांच्या कठडयावर सुंदर सेल्फी पॉईंट निर्माण करण्यात आले आहेत. हे सेल्फी पॉईंट नागपूर शहराची ओळख दर्शविताहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पनेतून स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरच्या दृष्टीने शहरात हा बदल दिसून येत आहे.शहरातून वाहणा-यां नाल्यांमध्ये कचरा टाकला जाउ नये यासाठी मनपाच्या स्लम विभागाद्वारे नाल्यांवरील पुलांवर कठडे लावण्यात आले आहेत. या कठड्यांवर लोखंडी जाळी लावण्यात आली असून या जाळ्यांवर सौंदर्यीकरण करून नागपूर शहराशी संबंधित संदेश देण्यात आले आहेत. ‘टायगर कॅपीटल’, ‘ऑरेंज सिटी’, ‘आय लव्ह नागपूर’ अशी आकर्षक सौंदर्यीकरण कार्य शहरातील तरुणाईंसाठी नवीन सेल्फी पॉईंट ठरले आहेत. मनपाची अभिनव ही संकल्पना नागरिकांच्या पसंतीस उतरली असून या सेल्फी पॉईंटला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.नागपूर महानगरपालिकेद्वारे फुटाळा टी पॉईंट, जिल्हा न्यायालय, गुप्ता हाउस, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ते फ्रीडम पार्क, अजीत बेकरी वर्धा रोड, साई मंदिर छत्रपती चौक, सोमलवाडा वर्धा रोड आदी ठिकाणी नाल्यांच्या कठड्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. नाल्यामध्ये टाकल्या जाणा-या कच-यामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने पाणी साचून राहते व त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. या सर्व समस्यांच्या निरसरणाकरिता नाल्यांमध्ये कचरा टाकला जाणार नाही याची काळजी घेण्याचे प्रयत्न आहे, अशी माहिती मनपाचे कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण यांनी दिली आहे.शहरातील विविध भागातील नाल्यांच्या कठड्यावर करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण होत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी दिसून येत आहे. आपले नागपूर शहर हे स्वच्छ, सुंदर आणि स्वच्छ असावे यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्वाची आहे. आपले शहर ही आपली जबाबदारी असून शहरात होणारे बदल आणि कार्ये हे प्रत्येक नागरिकासाठीच आहेत. आपल्या शहरात होत असलेले कार्य साबूत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव ठेवून नागपूर शहराचा रहिवाशी असलेल्या प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची वागणूक ठेवावी व शहरातील सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण होउ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : सीवर लाईन ब्लॉकेज, 75 हजारचा दंड वसुल

Wed Apr 5 , 2023
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.5) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 85 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com