दीक्षाभूमी स्मारक समितीवर डॉ.राजेंद्र गवई यांची सचिवपदी निवड 

नागपूर :- आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या दि.१९ जुलै २३ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत डॉ. राजेन्द्र गवई यांची सचिवपदी बहुमताने निवड झाली. समितीचे माजी सचिव डॉ.सुधीर फुलझेले यांनी त्यांच्या प्रकृतिच्या कारणामुळे सचिव पदाचा राजीनामा दिला होता. त्यावर आजच्या सभेमध्ये सविस्तर चर्चा होउन डॉ.सुधीर फुलझेले यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. सचिव पदासाठी डॉ.राजेन्द्र गवई यांचे नाव डॉ.प्रदीप आगलावे यांनी सुचविले. त्यांना विलासराव गजघाटे यांनी अनुमोदन दिले.

आजच्या सभेत उपस्थित समितीचे अध्यक्ष, भदन्त आर्य नागार्जून सुरई ससाई, डॉ. कमल रा.गवई, एन.आर.सुटे, प्राचार्य डी.जी.दाभाडे, अँड.आनंद फुलझेले, डॉ.प्रदिप आगलावे, डॉ.चंद्रशेखर मेश्राम, विलास गजघाटे, भन्ते नागदिपंकर या सर्वांनी डॉ. राजेन्द्र गवई यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोदी@9 चा विधी आघाडीतर्फे प्रचार-प्रसार

Wed Jul 12 , 2023
नागपूर :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने यशस्वीरित्या ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गेल्या नऊ वर्षात जे ठळक कामे केली त्याबद्दल पत्रक छापले.भारतीय जनता पार्टी विधी आघाडी तर्फे नागपुरात आकाशवाणी चौकात मोदी सरकारने केलेल्या कामाचे पत्रक वाटून-प्रचार प्रसार केला. सदर पत्रक वाटण्याकरिता रामभाऊ आंबुलकर, महामंत्री नागपूर,विष्णूजी चहांदे संघटन मंत्री, नागपूर,माजी खासदार डॉ. विकास महात्मे सर उपस्थितीत होते. भाजपा विधी आघाडी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com