संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-पी एम श्री योजने अंतर्गत कामठी तालुक्यातील 2 शाळांना मिळणार ‘अर्थबळ’
कामठी :- केंद्र व राज्य सरकारतर्फे राज्यात राबविण्यात येणाऱ्या पीएमश्री शाळा योजनेसाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 516 शाळा पात्र ठरल्या असून ज्यामध्ये कामठी तालुक्यातील दोन शाळांचा समावेश आहे.त्यानुसार कामठी नगर परिषद ची अब्दुल सत्तार फारुकी शाळा तसेच भुगाव ची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांचा समावेश असून या दोन्ही शाळांचा पीएमश्री योजने अंतर्गत आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे.
येत्या काळात या दोन्ही शाळांचा ‘आदर्श शाळा’म्हणून विकास केला जाणार आहे. या दोन्ही शाळांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचे निधी देण्यात येत असून ‘अर्थबळ ‘मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा मूलभूत गुणवत्तापूर्ण विकास करण्याबरोबरच त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवून उच्च दर्जाचा शैक्षणिक विकास साधने ,अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देणे या उद्देशातून पीएमश्री योजना राबवली जात आहे.महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेने पीएमश्री शाळा योजनेसाठी निवड झालेल्या शाळांची घोषणा केली असून त्यानुसार राज्यातील निवड झालेल्या 516 शाळेमध्ये कामठी तालुक्यातील 2 शाळांचा समावेश असून कामठी तालुक्याचे नाव उच्चांकीत झाले.
– पीएमश्री योजने अंतर्गत कामठी तालुक्यातील निवड झालेंल्या दोन शाळेपैकी कामठी नगर परिषद अब्दुल सत्तार फारुकी शाळा ही सरकारी शाळा असून या शाळेत पालकवर्ग शाळा प्रवेशासाठी दरवर्षी स्वयंस्फूर्तीने उत्सुक असतात .या शाळेत के जी ते चौथी पर्यंत 1100 विद्यार्थी शिक्षा ग्रहण करताहेत तसेच यावर्षीच्या सत्रात पहिल्या वर्गासाठी 150 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.एकीकडे प्रवेशासाठी खाजगी शाळेचे शिक्षक तसेच इतर शिक्षकांना शाळा प्रवेशासाठी शिक्षकांना द्रोणाचार्या च्या भूमिकेत विद्यार्थ्यांच्या शोधात भटकंती करावी लागते मात्र अब्दुल सत्तार फारुकी शाळेत विद्यर्थीसंख्या प्रवेश क्षमता पूर्ण होऊनही प्रवेशासाठी इतर पालकवर्ग उत्सुक असतात .तसेच दरवर्षी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट ला राष्ट्रीय एकात्मता वर निघणारी प्रभातफेरी ही लक्षणीय असते. हे इथं विशेष!तसेच कामठी शहरात एकूण 65 शाळा आहेत त्यातून एकमेव कामठी नगर परिषद सत्तार फारुकी शाळेची पीएमश्री योजने अंतर्गत आदर्श शाळा म्हणून निवड झाल्याने या शाळेतील शिक्षक वर्गाचे कौतुक करण्यात येत आहे.