भंडारा :- महिला व बाल विकास विभागातर्फे क्रांतीज्यती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत असून योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी.बी.टी.द्वारे देण्यात येतो.योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे बॅक खाते आधार सिडींग करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेत असलेल्या 10 वर्ष वयोगटातील बालकांचे त्यांच्या पालकांसोबतच संयुक्त बॅक खाते उघडून बँक खात्याशी बालकांचा आधार सिडींग करावा 10 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या बालकांचे स्वतंत्र बॅक खाते उघडून बँक खात्याशी बालकांचे आधार सिडींग करावा.बालकांचा आधार क्रमांक बॅक खात्याशी सिडींग नसल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही यांची लाभार्थ्यांच्या पालकांनी नोंद घ्यावी.
याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,भंडारा,पहिला माळा,जिल्हा मजुर संघ इमारत,मातोश्री हॉस्पीटल समोर,नागपूर नाकाजवळ, भंडारा येथे संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी केले आहे.