संशोधन संस्थेच्या योजना आणि धोरणे तळागाळात पोहचावी यासाठी शास्त्रज्ञांनी प्रतत्नशील असावे

– भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाचे उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी यांचे प्रतिपादन

नागपूर :- देशात संशोधनाची अग्रगण्य संस्था म्हणून पुढे येण्यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांची मानसिकता ही सकारात्मक असली पाहिजे तसेच संस्थेच्या योजना आणि धोरणे तळागाळात पोहचावी यासाठी शास्त्रज्ञांनी प्रतत्नशील असावे असे आवाहन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाचे उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी यांनी आज नागपूरच्या अमरावती रोड स्थित नॅशनल ब्युअरो ऑफ ऑफ सॉईल सर्वे अँड लँड युज प्लॅनिंग – एनबीएसएसएलयुपी- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी संयोजन या संस्थेच्या 47 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. याप्रसंगी महाराष्ट्र पशुवैद्यकीय आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ माफ्सूचे कुलगुरू डॉ .नितीन पाटील,गडचिरोली पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील , कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे सदस्य डॉ. बी.एस.द्विवेदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

एनबीएसएसएलयुपी नागपूरचे संचालक डॉ. एन.जी. पाटील यांनी यावेळी सांगितले की,डिजिटल सॉईल मॅपिंग हे तंत्रज्ञान वापरून कमी वेळात शेतकऱ्यांना शेतीसाठी सुपीक मातीची अद्यावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी संस्था तत्पर आहे. नॅशनल सॉईल ग्रीड स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असून देशातील मातीची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरु आहे.यावेळी त्यांनी भूमी जिओपोर्टलचा विकास, भारतीय राष्ट्रीय मृदा अभिलेखागार आणि राष्ट्रीय स्तरावर मातीच्या वर्णपट हस्ताक्षर ग्रंथालयाचा विकास या प्रकल्पांवरही प्रकाश टाकला.गडचिरोली मध्ये सध्या खाणकाम सुरू असून सीएसआर फंडाचा तेथे वापर होत आहे राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी संयोजन संस्थेमार्फत गडचिरोली मातीच्या गुणवत्तेबद्दल काही योजना धोरणे असतील तर त्याला गडचिरोली पोलीस दलाचे सहकार्य राहील असे गडचिरोली परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.डॉ.बी.एस. द्विवेदी यांनी शेतकर्‍यांसाठी माती संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यासाठी एकत्रित मृदा माहिती प्रणालीवर भर दिला .

एनबीएसएसएलयुपीच्या अहवालाचे प्रकाशन आणि गुणवंत शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले.डॉ.डी.वासू यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला एनबीएसएसएलयुपी संस्थेचे अधिकारी , शास्त्रज्ञ, संशोधक विद्याथी , कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Sat Sep 2 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार (ता.01) 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1 लक्ष 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. स्वस्त्याम सुपर स्पेशॉलिटी हॉस्पीटल, वर्धा रोड, नागपूर यांच्यावर जैव वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासोबत आढळून आल्याबद्दल कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com