संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- यशवंत विद्यालय वराडा येथे वराडा केंद्रा च्या केंद्रस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव पार पडला. स्पर्धेत वराडा केंद्रातील ११ शाळेच्या १०० विद्यार्थी खेडाळुनी कबड्डी, खो-खो, लंगडी, वैयक्तिक खेळ व सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला होता.
वराडा केंद्रस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम भूषण निंबाळकर संचालक यशवंत विद्यालय वराडा यांचे अध्यक्षेत व्यंकटराव कारेमोरे सदस्य जि प सदस्य गोंडेगाव सर्कल यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी सुनिल जामदार सरपंच ग्रा प वराडा, देवाजी शेळकी माजी उपसभापती, शहाजाद शेख, दिवाकर जामदार, राजेंद्र गभणे आदी उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धे त वराडा केंद्रातील ११ जि प शाळेचे जवळपास १०० विद्यार्थ्यी खेडाळुनी सहभाग घेतला होता. वरिष्ठ गटात गोंडेगाव व कोयला खदान या शाळांनी बाजी मारली. तर कनिष्ठ गटात बखारी, गोंडेगाव, वराडा व कोयला खदान या शाळांनी विजय मिळवला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख प्रविण बेंदले यांनी केले तर सुत्रसंचालन वामनराव पाहुणे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षक विश्वास पांडे, यावलकर, चांदेकर, नासरे, राजेंद्र गभणे, राकेश गणविर, मोतीराम रहाटे, दिपक पांडे, शिक्षिका लांजेवार, संगेवार, भिमटे, भगत, चवरे, वांदिले, बुटोलिया, सहारे, अर्चना शिंगणे, लोडेकर आदीनी सहकार्य केले.