आनंद नगरात शाळा प्रवेश दिवस

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस दिनांक 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.बाबासाहेबांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असल्याचे सांगीतले. शिकले, शिकवले, संघटीत केले. त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ शासनाने 2017 पासून 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.

त्यानुसार आनंद नगर कामठी येथील समाज भवनात धम्ममेघ अविष्कार केंद्र येथे सकाळी 10 वाजता भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जया मेश्राम, विद्या बोंबले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी प्रज्वल सोलंकी, विक्की बोंबले, शंकर चवरे,योगेश मेश्राम, बिरजू चहांदे ,निमिश सांगोड़े,प्रमोद बावने,रोहित मेश्राम,रामदास सिंगाड़े, नरेश बर्वे, अभिषेक कनोजे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डिजिटल क्रांतीमुळे अनेकांच्या खिशात आली बँक,अलीकडे एटीएम केंद्रही पडताहेत ओस

Tue Nov 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आजच्या आधुनिक युगात मोठ्या प्रमाणात डिजिटल क्रांती झाली असून यूपीआयमुळे एटीएम वरील व्यवहार सुमारे 30 टक्क्यांनी कमी झाला असून बरेच आर्थिक व्यवहार हे गुगल पे, फोन पे आदिच्या माध्यमातून मोबाईल ने होत आहेत त्यातच खिशात रोख रक्कम नसली तरी मोबाईल मध्ये असलेल्या यूपीआय सुविधे मुळे आर्थिक व्यवहार होत आहेत त्यामुळे एटीएम केंद्रात जाणाऱ्यांची संख्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com