चंद्रपूर ३ डिसेंबर :- भारतीय स्त्रीच्या समस्यांना वाचा फोडून त्या सोडवणाऱ्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात स्त्रीला देखील महत्वाचे स्थान मिळवून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रत्येकाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत, त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम केल्यास आपल्या सर्वांच्या जीवनात नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन उपायुक्त अशोक गराटे यांनी केले.कार्यक्रमास सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे,विकास दानव,संजय टिकले, अनिल बनकर, नरेंद्र जनबंधु, माधवी दाणी,सिद्दीक अहमद, नरेश वारुलवार, अनिल बाकरवाले,बेले तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
सावित्रीबाई फुले जयंती स्त्रीमुक्ती दिन मनपा कार्यालयात साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com