– ससाई चषक राष्ट्रीय कराटे स्पर्धा
– बाराशे स्पर्धकांचा सहभाग
नागपूर :-केशिंदो शोतोकान कराटे असोसिएशनतर्फे नागार्जुन टेंपल येथे झालेल्या ससाई चषक सातव्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ब्लॅक बेल्ट फाइट प्रकारात मुलांमध्ये सौरभ पाटील आणि मुलींमध्ये संस्कृतीने विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड व अन्य राज्यातील बाराशे कराटेपटू सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डेक्कन ग्रुपचे सतिश मेश्राम, स्वप्निलकुमार खांडेकर, आयोजक सुमीत नागदवने, सीमा नागदवने, राहुल बारमाटे,अपेक्षा नागदवने उपस्थित होते. विपिन हाडके (नागपुर), प्रवीन तिवारी (नागपुर) सचिन अंजीकर, (नागपुर), जावेद शेख (नागपुर), रिजू भट्टाचार्य (कलकत्ता), रविराज मौर्य (छत्तीसगढ़), रोशन बागडे (नागपुर), युवराज दुपारे (वरुड) रूपेश वर्मा (मध्य प्रदेश), चंद्रमनी डोंगरे, गंगाधर जाधव, (अकोला), राजेश भोसले (यवतमाल), संदीप येशिमोड (नांदेड़), सुमीत चानोरे (भंडारा), कृष्णा वघारे(साकोली)यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.
ब्लॅक बेल्ट फाइट प्रकारात मुलांमध्ये सौरभ पाटील आणि मुलींमध्ये संस्कृति गावंडे विजेते ठरले. दोन्ही कराटेपटू महाराष्ट्राचे आहेत. विजेत्यांना ससाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धकांना मार्गदर्शन करताना ससाई यांनी स्वरक्षणासाठी या कराटे या कलेचा उपयोग करावा, असे आवाहन करीत या कलेमुळे सतत स्फुर्ती आणि शरीर सृदृढ ठेवण्यास मदत मिळते. ही कला प्रत्येकाने शिकल्यास स्वरक्षण करता येईल, असेही ते म्हणाले. नागपुरात कराटे आणनारे भंते ससाई हे पहिले व्यक्ती आहेत. त्यांना कराटेतील भीष्म पितामह म्हटले जाते, असे मत सतिश मेश्राम यांनी व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तौफिक शेख, सिमरन फिरोज शेख, आयुष नागदवने, पियूष नागदवने, अभिषेक गुरनुले, शमिता, कार्तिक सोमकुवर, आर्यन गवतुरे, कार्तिक दुबे, हर्शल निमजे, कलश शर्मा यांनी सहकार्य केले.