शनिवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध  

नागपूर :  राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे.

            लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल,  ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे  कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दिली

तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय,कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय पाचपावली, प्रगती हाल दिघोरी येथे उपलब्ध आहे.

दिनेश दमाहे

9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

२७ व २८ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

Fri Nov 26 , 2021
ऑनलाईन मतदार नोंदणीला तरुणांचा प्रतिसाद चंद्रपूर – १ जानेवारी २०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी १ ते ३० नोव्हेंबर २०२१पर्यंत आहे. दावे व हरकती स्विकारण्याबाबत विशेष मोहीम २७ व २८ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. दरम्यान, या कालावधीत चंद्रपूर शहरातील अनेक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!