चंद्रशेखर वराडपांडे, कमलासुत हे खरे समाजप्रबोधक, महापौर दयाशंकरजी तिवारी
नागपुर – विदर्भातील सुप्रसिद्ध भागवताचार्य, गीतकार, काव्यलेखक, गजानन महाराज व महाशक्ती अनसूयामातेचे प्रचारक, रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थानाचे संस्थापक वै. वंदनीय संतकवी कमलासुत (बाबा) श्री चंद्रशेखर वराडपांडे यांच्या सेवाकार्याचा गौरव व्हावा या सदहेतूने महाराजा गारमेंट्स ते गजानन चौक रेशीमबाग – या सरळ मार्गाला वै. वंदनीय संतकवी कमलासुत श्री चंद्रशेखर वराडपांडे मार्ग असे नामकरण रविवार दि.27 फेब्रुवारी 2022 रोजी गजानन चौक, रेशीमबाग* येथे नरकेसरी प्रकाशन चे अध्यक्ष डॉ विलासजी डांगरे यांचे शुभहस्ते व नागपूर नगरीचे महापौर श्री दयाशंकरजी तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व भाविकवृंदांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार नागो गाणार सर, बालरोगतज्ज्ञ डॉ उदयजी बोधनकर, गजानन महाराज श्रद्धास्थानाचे संयोजक श्री गिरीशजी वराडपांडे, नगरसेविका सौ दिव्या धुरडे, सौ शीतल कामडे, उषाताई पायलट, किशोरजी धाराशिवकर, सुबोधजी चिंच्मालातपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रशेखर वराडपांडे, संतकवी कमलासुत हे समाजप्रबोधक, अध्यात्मिक उपासक असून लाखो भक्तपरिवाराला त्यांनी भक्तिमार्गाद्वारे धर्म जागरण व जीवन जगण्याचा संदेश दिला, त्यांच्या लेखन व काव्याचे परिचय पुढील पिढीला कळवा यासाठी त्यांचं कवितांच कलादालन आपण पुढील काळात निर्माण करू असा विश्वास महापौर दयाशंकरजी यांनी व्यक्त केला. या नामकरणासाठी प्रभाग 31 ड चे नगरसेवक डॉ रवींद्र छोटू भोयर यांनी विशेष पुढाकार घेतला असून कार्यक्रमाचे आयोजन नागपूर मनपाद्वारे व गजानन महाराज श्रद्धास्थान रेशीमबाग द्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले.याप्रसंगी रेशीमबाग येथील नागरिक व गजानन महाराज श्रद्धास्थानातील भक्त परिवार मोठया संख्येत उपस्थित होता.