संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 21:- प्रपंच जनावरेही करतात पण माणूस म्हणून एखाद्याची भूक भागवता आली पाहिजे.प्रेम करता आलं पाहिजे.यशोदा माताने श्रीकृष्ण परमात्म्यावर जीवापाड प्रेम केलं.भक्तीमध्ये स्वार्थीपणा नसावा .संत तुकाराम , संत ग्यानेश्वरांनी स्वतः दुःख सोसून जगाला सुखाचा मार्ग दाखवला.ईश्वरावर आर्त भावनेने प्रेम करा ,भक्ती प्रेमाची असावी ,भक्तीविना मानवाचा उद्धार होणार नाही .मानव जन्म भाग्याने मिळाला आहे.दुसऱ्याचे दुःख दूर करता येण्यासारखे काम करावे .संसारात राहूनही ईश्वराचे चिंतन करता येते. श्रीमद भागवत कथा त्यासाठीच आहे.असे विचार पोकाळीकर रहिवासी श्रीमद भागवत कथाकार ह.भ.प.सुरेश बोकडे यांनी मांडले.
कामठी तालुक्यातील आदर्श गाव कढोली येथिल हनुमान मंदिर प्रांगणात 11 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत श्री हनुमान मंदिर देवस्थान (पंचकमेटी)आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा महोत्सव सोहळ्यात ते मत मांडत होते.
ते पुढे म्हणाले भागवत कथा ज्ञानाची गंगा आहे.कथा ऐकल्याने संसाराची व्यथा दूर होते.जीवाचा उद्धार होतो पण कथा ऐकताना चित्त जागेवर असावे असेही मत मांडले.
माउली संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ओळीने प्रेरित होऊन संत वाङ्ममयाचा ज्ञानसरोवर न्हाऊन ब्रह्मज्ञानाचा आनंद लुटण्यासाठी हा वारकरी हरिनाम संकीर्तन सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, जी प सदस्य दिनेश ढोले, माजी जी प सदस्य अणिल निधान, जी प सदस्य अवंतिका लेकुरवाडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकूमचंद आमधरे, कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अनिकेत शहाणे, सोनू कुटे,ग्यानदेव गावंडे,शंकर जी घुले,अरुण शहाणे, लक्ष्मण ठाकरे, लक्ष्मण करारे,राकेश गावंडे, गेंदलाल कडू,अमोल ठाकरे, माणिक राव गावंडे, पांडुरंग काकडे आदींनी उपस्थिती दर्शविली होती .
या श्रीमद भागवत कथा महोत्सवाची सांगता 18 एप्रिल ला दुपारी 2 वाजता पालखी सोहळ्या नंतर महाप्रसाद वितरण करून करण्यात आला गावात संपूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या श्रीमद भागवत कथा महोत्सव च्या यशस्वीतेसाठी श्री हनुमान मंदिर देवस्थान चे पदाधिकारी ,सदस्यगनासह सरपंच प्रांजल वाघ, राजेश वाघ आदींनी मोलाची भूमिका साकारली.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वरांनी स्वता दुःख सोसून जगाला सुखाचा मार्ग दाखवला–ह.भ.प.सुरेश महाराज बाकडे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com