मुंबई, दि. 15 : थोर समाजसुधारक, क्रांतीकारी श्रीसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार संजय राठोड, माजी खासदार हरीभाऊ राठोड, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो, मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून श्रीसंत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.