अरोली :- रेवराल येथे महासंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावातील मुख्य रस्त्यांवर हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आला . ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजा अर्चना,पुष्पहार अर्पण करून गाडगेबाबांच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्यात आला. याप्रसंगी वृक्षारोपण सोहळाही साजरा करण्यात आला. यामध्ये गावातील बालगोपाल चा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. याप्रसंगी सरपंचा मनीषा आशिष पाटील, उपसरपंच मोहन धांडे, ग्रामपंचायत सदस्य अंतराम श्रावणकर , जिल्हा नियोजन समिती सदस्य आशिष पाटील, सह समस्त ग्रामपंचायत सदस्य गण, समस्त कर्मचवृंद ,गावातील महिला, पुरुष, बाल गोपाल उपस्थित होते.
रेवराल येथील स्वच्छता अभियान कागदावर नसून, प्रत्यक्षात राबविण्यात येत आहे, येथील मुख्य चौकातील सर्व सोयी सुविधांनी युक्त सार्वजनिक स्वच्छतागृह तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीचे तुलनेत शोभेची वस्तू ठरत नसून, येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व कर्मचारी यांचे विशेष लक्ष असल्याने आजही गावकऱ्यांच्या सहकार्याने सुस्थितीत असून त्याच्या नियमित वापर होत असल्याचे दररोज वृत्तपत्र वाटताना निर्देशनात येत आहे व त्याच्या वापर दररोज कोदामेंढी येथील विविध हिंदी ,मराठी ,इंग्रजी दैनिक , साप्ताहिकाचे वृत्तपत्र एजंट, वार्ताहर व न्यूज टुडे ट्वेंटी फोर बाय सेव्हन या ई पोर्टलचे ऑल इंडिया न्यूज रिपोर्टर(पत्रकार) किशोर कांता मदन साहू करतात,हे विशेष!