नागपूर :- विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर विधान भवनामध्ये त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संदीप जोशी शुक्रवारी २१ मार्च रोजी विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून संदीप जोशी यांची निवड केली होती. या निवडीनंतर जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले होते. विधान परिषदेचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेउन त्यांचे आभार देखील मानले होते.
गुरुवारी २० मार्च रोजी विधिमंडळ प्रशासनाच्या वतीने संदीप जोशी यांना विधान परिषदेचे सदस्य म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.