समता सैनिक दलाची स्थापना परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली-मार्शल वीरेंद्र मेश्राम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14- परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली . २४ सप्टेंबर. १९२४ साली बाबासाहेबांनी महाडला एक परिषद भरविली होती. महाडच्या सत्याग्रहा पूर्वीची ही परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२७चा काळ पाहता चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन या महत्त्वाच्या घटना आहेत. समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक आता मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होते. सवर्णांना हे आवडणे शक्य नव्हते, त्यांचा वर्चस्वाचा अहंकार दुखविला जाणे साहजिक होते, हे स्वाभिमानाचे नवे वारे सवर्ण समाजाला झोंबत होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावा – गावात सवर्णांकडून अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समता सैनिक दलाची’ स्थापना केली होती. आणि आजही ही संघटना कार्यरत आहे. आणि डॉ बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचा व्यापक प्रसार कामठी तुन करण्यात येत असल्याचे मनोगत मार्शल वीरेंद्र मेश्राम यांनी केले.
राहुल बुद्ध विहारात आयोजित विचार संगोष्ठी 2022 कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमा अंतर्गत कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्शल ऍड प्रकाश दार्शनिक यांनी द्वितीय विश्वयुद्ध और डॉ बाबासाहेब आंबेडकर इस ‘किताब की मौलीकता तसेच आंबेडकरी संघटनाओके एकता की वास्तविकता और हम ‘या विषयावर संगोष्ठी मार्गदर्शन केले तसेच प्रमुख वक्ता मार्शल डॉ एन व्ही ढोके यांनी पाली ही संस्कृत भाषा की जननी है, ‘किताब से संस्कृत के श्रेष्ठता की खुलिपोल या विषयावर मौलिक असे मार्गदर्शन केले. जीवन जगताना द्वेष, मत्सर आणि लोभासारख्या प्रचंड वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो परिणामी आपण दुःखाच्या खाईत लोटले जातो त्यातून आपल्याला कुठलाही मार्ग गवसत नाही तेव्हा सुखाची अनुभूती ही बुद्ध धम्माचे आचरण केल्यावरच मिळू शकत असल्याचे मत जिल्हा संघटक नितीन डोंगरे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी या संगोष्ठी कार्यक्रमात दिपंकर सहारे,ओमप्रकाश मेंढे, संग्राम सनकाळे, अंगद उके, जगदंबे, सुधीर मेश्राम, राजकुमार मेंढे, निलेश मेश्राम, संदीप रामटेके, प्रशांत गजभिये, सुमेध टेंभुरने, आकाश मेश्राम, अंशुल तांबे,राजीव शेंडे, सतीश मेश्राम, सिद्धी नागदेवें, विनय कांबळे, वेदांत मेश्राम, संबोधी कांबळे, त्रिश कांबळे, प्रशिक मेंढे, प्रवीण टेंभुरने,श्रेयश टेंभुरने,आकाश गेडाम, बेलेकर, सिद्धांत मेश्राम, रितिक रंगारी, प्रतीक चांदोरकर, अश्विन बावनगडे,अक्षय चिंचखेडे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जुने प्रभाग क्र 3 येथे पाणी टाकी निर्मितीचे काम मागील दहा महिन्यापासून थंडबसत्यात

Wed Jun 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 14:- उन्हाळा म्हटला की शहरात दरवर्षी पाण्याची टँचाई जाणवते व सर्वत्र पाणी मिळत नसल्याची ओरड सुरू होते या बाबी गांभीर्याने लक्षात घेत नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नाला आलेल्या यशातून कामठी नगर परिषद ला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांन योजना अंतर्गत कामठी शहरात निर्माण करणाऱ्या तीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com